सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची कमाई ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! ‘भाईजान’साठी जीवही देण्यास तयार

शेराची स्वत:ची सेक्युरिटी एजन्सी आहे. टायगर सेक्युरिटी असं या एजन्सीचं नाव असून ती जगभरातील सेलिब्रिटींसाठी सुरक्षा पुरवते. सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटातदेखील टायगर सेक्युरिटीचा उल्लेख होता.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची कमाई ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! 'भाईजान'साठी जीवही देण्यास तयार
Salman Khan and Shera Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 4:54 PM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा स्वत: कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. कामातील त्याचा प्रामाणिकपणा आणि गेली अनेक दशकं सलमानसोबत असलेलं त्याचं नातं यांमुळे तो अनेकदा प्रकाशझोतात असतो. शेराचं मूळ नाव गुरमीत सिंग जॉली असं आहे. शेरा हा सलमानचा बॉडीगार्ड कसा झाला, तो वर्षाला किती कमावतो आणि त्याच्या आवडी-निवडी काय आहेत, ते जाणून घेऊयात..

शेरा सलमानचा बॉडीगार्ड कसा बनला?

शेरा हा बॉडीबिल्डर होता. 1987 – 1988 दरम्यान त्याने बऱ्याच बॉडीबिल्डिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवलं होतं. 1993 पासून त्याने हाय प्रोफाइल बॉडीगार्ड म्हणून काम करण्यास सुरूवात केली. सलमानच्या आधी त्याने मायकल जॅक्सन, जॅकी चॅन, विल स्मित आणि केनू रिव्ह्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसाठीही काम केलंय. सलमान आणि शेराची पहिली भेट ही गायक व्हिगफिल्डच्या शोमध्ये झाली. त्यानंतर 1995 मध्ये सलमान केनू रिव्ह्सच्या पार्टीत पुन्हा एकदा शेराला भेटला. तिथे सोहैल खानने शेराला सलमानचा बॉडीगार्ड होण्याची मागणी केली. 1998 मध्ये शेराने सलमानच्या चंदीगडमधल्या शोसाठी पहिल्यांदा बॉडीगार्ड म्हणून काम केलं. तेव्हापासून तो सलमानच्या सेवेत कायम रूजू आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Being Sheraa (@beingshera)

शेराची कमाई

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेरा वर्षाला दोन कोटी रुपयांची कमाई करतो. दर महिन्याला त्याला जवळपास 15 लाख रुपये मिळतात. शेराला गाड्यांची खूप आवड आहे. जून 2021 मध्ये त्याने महिंद्रा थार विकत घेतली. त्याच्याकडे कावासाकी सुपरबाईक आणि बीएमडब्ल्यूसुद्धा आहे.

शेराची सेक्युरिटी एजन्सी

शेराची स्वत:ची सेक्युरिटी एजन्सी आहे. टायगर सेक्युरिटी असं या एजन्सीचं नाव असून ती जगभरातील सेलिब्रिटींसाठी सुरक्षा पुरवते. सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटातदेखील टायगर सेक्युरिटीचा उल्लेख होता. याच चित्रपटाच्या शीर्षकगीतात शेरासुद्धा झळकला होता.

सलमानसाठी जीव देण्यासही तयार

एका मुलाखतीत शेरा म्हणाला होता की सलमान मालिक त्याच्यासाठी सर्वकाही आहे. “मी त्यांच्यासाठी माझा जीवसुद्धा देऊ शकतो. तो माझा देव आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाईसोबतच राहीन”, असं तो म्हणाला. सलमान शेराचा मुलगा अभीरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचंही म्हटलं जातंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.