सलमान खानने सरळ हात जोडले अन्… म्हणाला ,’मी खूप वादांमधून गेलोय पण आता….”
सलमान खान त्याच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि त्याने वादांपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की त्याला आता कोणताही वाद नको आहे आणि त्यामुळे कुटुंबालाही कोणता त्रास नकोय असंही त्याने इच्छा व्यक्त केली. पण सलमान नक्की असं का म्हणाला?

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान हा बॉलिवूडमधला सर्वांचा आवडता अभिनेता आहे. त्याच्याबद्दल नक्कीच कोणत्या ओळखीची आवश्यकता नाही. सलमान खान हा बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो त्याच्या शैलीने चाहत्यांना प्रभावित करत असतो. पण सोबतच सलमानचे बऱ्याच वादांशी नावही जोडले जाते. सध्या सलमान खान त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, त्याने सर्वांन म्हटलं की तो आधीच बऱ्याच कॉंट्रोवर्सीमध्ये अडकला आहे आता नवा वाद नको. पण तो असं का म्हणाला? चला जाणून घेऊयात.
सलमान खान कोणत्या वादांमुळे चर्चेत होता
सलमान खान अनेक वादामुळे आधीच बऱ्याचदा चर्चेत राहीला आहे. मग तो राजस्थानमधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीट शिकार असो, रोडरेज प्रकरण असो, ऐश्वर्या रायसोबतचा वाद असो किंवा विवेक ओबेरॉयला धमकी दिल्याचा आरोप असो, गायक अरिजीत सिंगसोबतचे शीतयुद्ध असो, शाहरुख खानसोबतचे त्याचे भांडण, असे अनेक वाद आहेत ज्यात सलमानचे नाव गुंतलेले आहे. पण या कठीण काळातही चाहत्यांनी नेहमीच सलमान खानला पाठिंबा दिला.
“मी आधीच खूप वादांमधून गेलो आहे…”
‘टायगर ३’ नंतर आता सर्वांना उत्सुकता होती ती सलमान खानच्या ‘सिकंदर’ची आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सलमान खानने कोणत्याही नव्या वादात न सापडण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना सलमान खानने चित्रपटापाच्या कॉंट्रोवर्सीबद्दल बोलला आणि हात जोडून म्हणाला – ‘अरे नाही… मला आता कोणताही वाद नको आहे… मी आधीच खूप वादांमधून गेलो आहे आणि आता मला वाटत नाही की कॉंट्रोवर्सीमुळे चित्रपट हिट होतो. शुक्रवारी रिलीज होणारा चित्रपट पुढील मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ द्या पण कॉंट्रोवर्सी होऊ देऊ नका असही सलमान खानने म्हटलं आहे.
#WATCH | Mumbai: “…Bohot saare controversies se guzar chuke hai hum, humko nahi chahiye koi controversy…Yeh pariwar bas without controversies life-long rahe…Kaafi dekh chuke hai hum” says actor Salman Khan pic.twitter.com/Ixr39TqYky
— ANI (@ANI) March 29, 2025
सलमान खानने त्याच्या कुटुंबाबद्दल काय म्हटले?
सलमान खान पुढे म्हणाला, ‘आम्ही खूप काही पाहिले आहे आणि आता आमच्याकडे पाहण्यासाठी काहीही नाही. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की कुटुंबाने कोणत्याही वादविवादाविना आयुष्य जगावं… हीच आमची आता एकमेव इच्छा आहे.” चित्रपटाबाबत सलमान पुढे म्हणाला, ‘तुम्ही चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ट्रेलर काहीच नव्हता कारण ट्रेलरमध्ये बऱ्याच गोष्टी दाखवता येत नाहीत. या चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप आवडतील”
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत…
सलमान खानने ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून आलेल्या धमकीच्या प्रश्नावर देखील उत्तर दिले. तो म्हणाला ‘देव आणि अल्लाह आपल्यासोबत आहेत, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण जगू…’