लग्न अरबाजचं चर्चा सलमानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला ‘भाईजान’

अभिनेता अरबाज खानने रविवारी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. बहीण अर्पिताच्या घरीच अरबाज आणि शुराचा निकाह पार पडला. या निकाहनंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सलमान खान त्याच्या भावाच्या लग्नात नाचताना दिसत आहे.

लग्न अरबाजचं चर्चा सलमानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला 'भाईजान'
सलमान खान, अरबाज खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 10:00 AM

मुंबई : 25 डिसेंबर 2023 | रविवारी 24 डिसेंबर रोजी अभिनेता अरबाज खानने दुसऱ्यांदा निकाह केला. मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी अरबाजचा निकाह पार पडला. यावेळी खान कुटुंबीय आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज आणि शुराच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बहीण अर्पिता खानच्या घरी हा निकाह पार पडला. यावेळी भाऊ सलमान खानच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं. भावाच्या निकाहला जाताना सलमानने आधी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देणं टाळलं. गाडीतून उतरल्यानंतर तो थेट आत गेला. मात्र आता लग्नातील त्याच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सलमान खान हा त्याच्याच ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत अरबाजचा मुलगा अरहान आणि पत्नी शुरा खानसुद्धा थिरकताना दिसत आहेत. अरहानसोबत सलमान त्याच्या गाण्यावरील ‘हुक अप’ स्टेप करताना दिसला. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

‘पटना शुक्ला’ या नव्या चित्रपटाच्या सेटवर अरबाज खानची ओळख मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी झाली. त्याआधी तो मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. “अरबाज आणि शुराने अचानक निकाहचा निर्णय घेतला आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांना निकाह करायचा होता”, अशी माहिती सूत्रांनी दिली. अरबाज आणि शुरा त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगून होते.

पहा व्हिडीओ

कोण आहे शुरा खान?

शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असून तिचे 13.2 हजार फॉलोअर्स आहेत. शुराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली.

56 वर्षीय अरबाज हा गेल्या काही वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीत अरबाजशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला. अरबाज आणि शुराच्या लग्नाला आई सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सोहैल आणि सलमान खान, मुलगा अरहान खान यांच्यासह बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी, साजिद खान यांचा त्यात समावेश होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.