Salman Khan | ‘सलमान खान याला आम्ही संपवणारचं…’, भाईजानला ‘या’ व्यक्तीकडून जीवेमारण्याची धमकी
सलमान खान याला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने नाही तर, 'या' व्यक्तीने दिली जीवे मारण्याची धमकी.. भाईजानच्या जीवाला मोठा धोका!
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या आहेत. ज्यामुळे भाईजानच्या सुरक्षेत मोठी वाढ झाली आहे. एवढंच नाहीतर, अभिनेत्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. दरम्यान कुख्यात गुंड सतविंदर सिंग उर्फ गोल्डी बारर याने देखील सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.. ‘सलमान खान आमच्या निशाण्यावर आहे आणि संधी साधत त्याला संपवू…’ अशी धमकी सलमान खान याला देण्यात आली आहे. शिवाय गोल्डीने गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.
नुकताच झालेल्या एक मुलाखतीत गोल्डी म्हणाला, ‘आम्ही सलमान खान याला संपवणार आहोत. भाई साहेबने (लॉरेन्स बिश्नोई) त्याला माफी मागण्यासाठी सांगितलं होतं. फक्त सलमान खानच नाही आमच्या प्रत्येक दुश्मनाला आम्ही जीवे मारणार आहोत. पणस सध्या सलमान खान आमच्या निशाण्यावर आहे…’
सांगायचं झालं तर, २२ मे २०२२ मध्ये पंजाबमध्ये सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. गोळी मारुन गायकाला जीवे मारलं होतं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तेव्हा गोल्डीने गुन्हा कबूल देखील केला होता. ‘सिद्धूला पूर्ण विचार करुन मारलं होतं…’ असं देखील गोल्डी म्हणाला होता.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येबद्दल गोल्डी म्हणाला, ‘त्याला प्रचंड अहंकार होता. त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त पैसै होते. सिद्धूकडे पॉलिटीकल आणि पोलिसांची पॉव्हर होती, ज्याता तो सतत गैरवापर करत होता. त्याला धडा शिकवणं फार गरजेचं होतं. सिद्धूने काही चुका केल्या होत्या, ज्याला माफी नव्हती…’ असं खळबळजनक वक्तव्य गोल्डीने केलं आहे.
दरम्यान, सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठी कबुली दिली आहे. चौकशीत लॉरेन्स बिश्नोई याने फक्त सलमान खान यालाच नाही तर आणखी ९ जणांना जीवे मारणार असल्याची कबुली दिली आहे.
एनआयएच्या चौकशीत बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. जोधपूरमध्ये ज्या काळवीटाची शिकार सलमान खानने केली त्याची बिश्नोई समाज पूजा करतो. या कारणामुळे लॉरेन्स बिश्नोई याला सलमान खानला जीवे मारायचं आहे.. धक्कादायक गोष्ट म्हणजे भाईजानची रेकी करण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवल्याची कबुलीही त्याने दिली, मात्र त्याला अटक केली.
बिश्नोई याने सलमान खान याला धमकी दिल्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून अभिनेत्याला व्हाय प्लस सुरक्षा देखील दिली आहे. शिवाय अभिनेत्या बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे.