Salman Khan च्या एक्स – गर्लफ्रेंडकडून कंगना रनौतचं कौतुक; इंडस्ट्रीचं मोठं सत्य अखेर समोर

Salman Khan | अभिनेता सलमान खान याच्यावर कायम टीका करणाऱ्या एक्स - गर्लफ्रेंडन केलं कंगना रनौत हिचं कौतुक.... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील बसणार नाही विश्वास....

Salman Khan च्या एक्स - गर्लफ्रेंडकडून कंगना रनौतचं कौतुक; इंडस्ट्रीचं मोठं सत्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 2:58 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कंगना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण कंगना आता सिनेमांमुळे नाही तर, एखाद्या मुद्द्यावर केलेल्या स्वतःच्या भूमिकेमुळे चर्चेत असते. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणााऱ्या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम स्वतःच्या स्पष्ट भूमिका मांडत असते. ज्यामुळे अभिनेत्री कायम वादात्या भोवऱ्या अडकलेली असते. पण अभिनेता सलमान खान याची एक्स – गर्लफ्रेंड सोमी अली हिने मात्र कंगना रनौत हिचं कौतुक केलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

कंगना सोमी अली हिचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘माझ्याकडे तुझं असं सत्य आहे, जे कधीही समोर आलं नाही…’ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोमीचं कौतुक करत म्हणाली, ‘कंगना एक अशी अभिनेत्री आहे जी कधीही शांत बसत नाही. ती कायम सत्याचा साथ देते, सत्य बोलते. ‘

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तिच्यावर अन्याय झाला तरी ती कॅमेऱ्यासमोर येत गोष्टींचा विरोध करते. मी कंगनाची एक मुलाखत पाहिली होती. ज्यामध्ये तिने स्वतःला उत्तम प्रकारे सादर केलं होतं. मी तिचा आदर करते. इडस्ट्रीला सत्य बोलणाऱ्या व्यक्ती आवडत नाहीत…’ असं सोमी कंगनाबद्दल म्हणाली. कंगना हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोमी अली हिने सलमान खान हिच्यावर लावले गंभीर आरोप…

सलमान खान याच्यावर सोमी अली अनेक आरोप लावले होते. सोशल मीडियावर देखील सोनीने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमी अलीच नाही तर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले होते. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.

कंगना हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘इमर्जन्सी’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणारआहे, ज्यामध्ये अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कंगना हिच्यसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘इमर्जन्सी’ कंगना ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी 2’ सिनेमात देखील दिसणार आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा तमिळ सिनेमातील हिट हॉरर सिनेमा ‘चंद्रमुखी’ चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. ‘चंद्रमुखी 2’ मधील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.