Salman Khan च्या मनगटावरील गोल्डन वॉच चर्चेत; घड्याळ्याच्या किंमतीत सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करू शकेल घर!

या फोटोंमध्ये त्याच्या मनगटावर एक घड्याळ पहायला मिळालं. या घडाळ्यावर तसं फारसं कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. मात्र आता त्याची किंमत समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सलमानच्या या घड्याळ्याचीच चर्चा होतेय.

Salman Khan च्या मनगटावरील गोल्डन वॉच चर्चेत; घड्याळ्याच्या किंमतीत सर्वसामान्य व्यक्ती खरेदी करू शकेल घर!
Salman Khan and Sumbul Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 8:50 AM

मुंबई: बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याचा शो बिग बॉसमुळे तर कधी त्याच्या चित्रपटांमुळे तो सोशल मीडियावर प्रकाशझोतात असतो. सलमानचे चाहते नेहमी त्याला मोठ्या पडद्यावर बघू इच्छितात. भाईजानच्या चित्रपटांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. चित्रपटांसोबतच दरवर्षी त्याच्या बिग बॉस या शोचीही प्रचंड उत्सुकता असते. बिग बॉसचा सोळावा सिझन नुकताच संपला आहे. मात्र त्याच्याशी निगडीत चर्चा अद्याप संपल्या नाहीत. यादरम्यान सलमानच्या हातावरील घड्याळ चर्चेचा विषय ठरला आहे.

बिग बॉस 16 संपल्यानंतर सलमान खानने सर्व स्पर्धकांसोबत फोटो क्लिक केला होता. या फोटोंमध्ये त्याच्या मनगटावर एक घड्याळ पहायला मिळालं. या घडाळ्यावर तसं फारसं कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. मात्र आता त्याची किंमत समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सलमानच्या या घड्याळ्याचीच चर्चा होतेय. इंडियन वॉच कॉनेसर नावाच्या इन्स्टाग्राम पेजने सलमानच्या घडाळ्याचा फोटो पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एका बाजूला सलमानने त्याच्या हातात घड्याळ घातल्याचं पहायला मिळतंय. तर दुसरीकडे फक्त घडाळ्याचा स्पष्ट फोटो पोस्ट करण्याता आला आहे. इंडियन वॉच कॉनेसरच्या मते सलमानने घातलेलं हे घड्याळ रोलेक्स कंपनीचं आहे आणि त्याचा मॉडेल YACHT आहे.

या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या या घड्याळ्याला 18 कॅरेट गोल्ड केस (Gold Case) लावण्यात आला आहे. या घडाळ्याची रिटेल किंमत ही तब्बल 28 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. तर त्याची मार्केटमधील किंमत ही जवळपास 35 लाख रुपये असल्याचं म्हटलं जातंय. या किंमतीत सर्वसामान्य व्यक्ती एक घर खरेदी करू शकतं. त्यामुळे सलमानच्या या घडाळ्याच्या किंमतीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होतेय.

बिग बॉस 16 शो संपल्यानंतर आता सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान दोन वेगवेगळ्या लूकमध्ये पहायला मिळणार आहे. हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात सलमानने बऱ्याच तरुण कलाकारांना संधी दिली आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.