सलमान खानच्या वडिलांना धमकी, महिलेचा बुरख्यातील फोटो समोर, सर्वत्र खळबळ

Salman Khan Father: बॉयफ्रेंडच्या स्कुटीवर बुरख्यात असलेली एक महिला, सलमान खानच्या वडिलांनी धमकी देवून झाली फरार, तिचा पहिला फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ, सध्या सर्वत्र सलमान खान आणि सलीम खान यांची चर्चा...

सलमान खानच्या वडिलांना धमकी, महिलेचा बुरख्यातील फोटो समोर, सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 8:33 AM

Salman Khan Father: फरार गुंड लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देणाऱ्या महिलेचा पहिला फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये महिलेने बुरखा घातला असून, महिला बॉयफ्रेंडसोबत स्कूटीवर बसलेली दिसत आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये महिलेच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. पण बुरख्यामुळे महिलेचा चेहरा दिसत नाही. महिलेने जेव्हा सलीम खान यांना धमकी दिली, तेव्हा गुरुवारी सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.

सलीम खान यांना धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच सर्वत्र खळबळ माजली. आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. रिपोर्टनुसार, गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी सलमान खानच्या वडिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एका अटक देखील कण्यात आली आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना गेल्या एक वर्षापासून लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून जीवेमारण्याचा धमक्या येत आहेत. त्यामुळे भाईजान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. दरम्यान, गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली.

रिपोर्टुनुसार, महिलेने जेव्हा धमकी दिली, तेव्हा सलीम खान एका कट्ट्यावर बसले होते. रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ‘जेव्हा सलीम खान सकाळी वॉकसाठी निघाले होते, तेव्हा एक बुरखा घातलेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत आली आली सलीम खान यांना म्हणाली, ‘लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?”, मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे ओळख अद्याप पटलेली नाही.

महिलेचा बिश्नोई गँगसोबत नाही कोणतेच संबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपास पूर्ण झाला असून दोघांचा बिष्णोई टोळीशी संबंध नसल्याचे सांगितलं आहे. सलीम खान यांना फक्त त्रास देण्यासाठी महिलेने असं केल्याची माहिती समोर आली आहे. घडलेल्या घटनेनंतर, सलीम खान यांनी पोलिसांनी सर्वकाही सांगितलं. गाडीचा नंबर 7444 असल्याचं देखील त्यांनी सांगतलं. पण त्यांना पूर्ण नंबर पाहता आला नाही.

सांगायचं झालं तर, गेल्या एक वर्षापासून सलमान खान याला सतत जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. सतत येत असलेल्या धमक्यांमुळे माझे आणि माझ्या कुटुंबियांचे प्राण धोक्यात आहे… असं खुद्द सलमान खान म्हणाला होता. याची जबाबदारी देखली गुंड लॉरेन्स बिश्नोईने स्वीकारली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.