Salman Khan | आमिर खानच्या मुलीसाठी सलमानची पोस्ट चर्चेत; म्हणाला ‘कमाल है यार..’

अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या मानसिक आरोग्याविषयी अनेकदा मोकळेपणे व्यक्त झाली. इतकंच नव्हे तर त्यासाठी तिने अगस्तु फाऊंडेशनचीही स्थापना केली आहे. अभिनेता सलमान खानने तिच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. आयरासाठी त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

Salman Khan | आमिर खानच्या मुलीसाठी सलमानची पोस्ट चर्चेत; म्हणाला 'कमाल है यार..'
Salman Khan and Aamir Khan with daughterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 5:41 PM

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिच्या मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आयरा गेल्या काही वर्षांपासून नैराश्याचा सामना करतेय. त्यातून बाहेर येण्यासाठी तिने काय केलं आणि इतरांनी काय करायला हवं, याबद्दल ती सोशल मीडियाद्वारे सतत मार्गदर्शन करत असते. आयराने यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली. त्यावर अभिनेता सलमान खानने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. सलमानने आयराच्या कामाचं कौतुक केलं. ‘मुलं मोठी झाली आहेत’, असं त्याने म्हटलंय.

मानसिक आरोग्याविषयीची आयरा खानची पोस्ट शेअर करत सलमानने लिहिलं, ‘कमाल है यार. बच्चे बडे हो गए. बडे स्ट्राँग हो गए और बडे समझदार भी… गॉड ब्लेस यू बेटा’ (कमाल आहे यार. मुलं मोठी झाली. मुलं खूप खंबीर झाली आहेत आणि समजूदारसुद्धा.. मला हे आवडलंय. देवाचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहू दे). सलमानची हीच पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

सलमानची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

एका मुलाखतीत आयराने तिच्या डिप्रेशनसाठी पालकांच्या घटस्फोटाला जबाबदार ठरवलं आहे. आईवडिलांचा घटस्फोट हा परस्पर संमतीने जरी असला तरी त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाल्याचं ती म्हणाली. पाच वर्षांपूर्वी आयराला क्लिनिकल डिप्रेशनचं निदान झालं होतं. याविषयी ती वेळोवेळी सोशल मीडियावर व्यक्त झाली. नैराश्यातून बाहेर येण्याच्या या प्रवासात वडील आमिर खान, आई रिना दत्ता आणि सावत्र आई किरण राव यांच्याकडून मदत मिळत असल्याचंही आयराने सांगितलं. या सर्वांसोबत तिचा एक चॅट ग्रुप आहे आणि जेव्हा कधी गरज असेल तेव्हा ती त्यांची मदत घेते. होणारा पती नुपूर शिखरेकडूनही मोठी साथ मिळाल्याचं आयराने या मुलाखतीत नमूद केलं होतं. गेल्या वर्षी आयरा आणि नुपूरने साखरपुडा केला.

आयरा खान ही आमिर आणि रिना दत्त यांची दुसरी मुलगी आहे. आयराला मोठा भाऊ असून त्याचं नाव जुनैद असं आहे. आमिर खान आणि रिना दत्त यांनी 18 एप्रिल 1986 रोजी लग्न केलं होतं. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं. 3 जुलै 2021 रोजी किरण आणि आमिर विभक्त झाले.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.