Salman Khan | एक्स गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ कृतीमुळे सर्वांसमोर लाजला सलमान; चाहते म्हणाले ‘हिच्याशीच लग्न कर’

काही सेकंदांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'बस संगीतासोबतच सलमान खुश दिसतो, हिच्यासोबतच लग्न कर', असं एकाने लिहिलं. तर 'आता समजलं की सलमान खानने लग्न का नाही केलं', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Salman Khan | एक्स गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृतीमुळे सर्वांसमोर लाजला सलमान; चाहते म्हणाले 'हिच्याशीच लग्न कर'
Salman Khan and Sangeeta BijlaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 8:28 AM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही तुफान चर्चेत असतो. नुकतीच सलमानने बहीण अर्पिता खान आणि मेहुणा आयुष शर्मा यांनी आयोजित केलेल्या ईद पार्टीला हजेरी लावली. सलमानसोबतच या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. सध्या या पार्टीतील सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत पहायला मिळत आहे. या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांच्यातील केमिस्ट्री सहज पहायला मिळतेय. यामध्ये पत्रकार रजत शर्मा यांच्यासोबत सलमान खान गप्पा मारत चालत असतो. त्याचवेळी तो संगीताबद्दल काहीतरी मस्करी करतो. तेव्हा संगीतासुद्धा मस्करीत त्याच्या गालावर पंच करताना दिसते. यावेळी सलमानच्या चेहऱ्यावरही हास्य पहायला मिळतं. इतक्या वर्षांनंतरही या दोघांची मैत्री पाहून चाहते पुन्हा फिदा झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

काही सेकंदांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बस संगीतासोबतच सलमान खुश दिसतो, हिच्यासोबतच लग्न कर’, असं एकाने लिहिलं. तर ‘आता समजलं की सलमान खानने लग्न का नाही केलं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘हे दोघं एकमेकांसोबत खूप चांगले दिसतात’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा सलमानने त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला, तेव्हासुद्धा संगीता बिजलानी आणि त्याच्यातील खास बाँडिंग नेटकऱ्यांना पहायला मिळाली होती. या वाढदिवसाच्या पार्टीत जेव्हा संगीता बिजलानी पोहोचली, तेव्हा सलमानला त्याचं जुनं प्रेम आठवलं. संगीताला पाहताच सलमानने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठी मारली होती.

सलमान खान आणि संगीता बिजलानी हे एकेकाळी एकमेकांना डेट करायचे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत चांगल्याच रंगायच्या. जवळपास 10 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. 1986 मध्ये सलमान आणि संगीता एकमेकांना डेट करू लागले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या लग्नाची पत्रिकासुद्धा छापली गेली होती. मात्र संगीताने सलमानसोबतचं नातं तोडलं. त्यावेळी सलमान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. हे जेव्हा संगीताला समजलं, तेव्हा तिने सलमानसोबतचं नातं तोडलं. संगीताने नंतर 1996 मध्ये क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. जवळपास 14 वर्षांच्या संसारानंतर 2010 मध्ये संगीताने घटस्फोट घेतला. सलमान आणि संगीता यांच्यात आजही खूप चांगली मैत्री आहे. सलमानच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही अनेकदा संगीताला पाहिलं जातं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.