Salman Khan | ‘बिश्नोई गँगची एवढी दहशत?’; सलमानभोवती बॉडीगार्ड्सचा घोळका पाहून नेटकरी अवाक्!

'लॉरेन्स बिश्नोईची एवढी दहशत', असं एकाने लिहिलं. तर काहींनी सलमानच्या डॅशिंग अंदाजावर कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या टीमला धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती.

Salman Khan | 'बिश्नोई गँगची एवढी दहशत?'; सलमानभोवती बॉडीगार्ड्सचा घोळका पाहून नेटकरी अवाक्!
Salman KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 2:46 PM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान लवकरच बिग बॉस ओटीटीच्या दुसरा सिझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. हा सिझन सुरू होण्यापूर्वी सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतंच त्याला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी त्याच्या अवतीभोवती बॉडीगार्ड्सचा घोळका आणि तगडी सुरक्षाव्यवस्था पाहून नेटकरी अवाक् झाले. काही दिवसांपूर्वी सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गँगकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांनंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या कार्यक्रमात सलमानभोवती सुरक्षारक्षकांचा घोळका पहायला मिळतो.

सलमान जेव्हा मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याच्यासोबत बॉडीगार्ड शेरासुद्धा दिसला. शेरासोबतच इतरही सुरक्षारक्षक सलमानच्या आजूबाजूला होते. बॉडीगार्ड्सच्या या घोळक्यातून पुढे चालतानाचा सलमानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरक्षेच्या कारणामुळेच सलमान त्याच्या चाहत्यांचीही भेट घेऊ शकत नाही. त्याच्या अवतीभोवती इतके बॉडीगार्ड्स पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘लॉरेन्स बिश्नोईची एवढी दहशत’, असं एकाने लिहिलं. तर काहींनी सलमानच्या डॅशिंग अंदाजावर कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या टीमला धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमानच्या घराबाहेर ते गर्दीलाही जमू देत नाहीत. धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

पहा व्हिडीओ

सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला तुरुंगातून धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने 1998 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानकडे माफीची मागणी केली. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्याने दिला. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, असं लॉरेन्स म्हणाला होता.

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.