Salman Khan | ‘जुना सलमान परत आला..’; ‘भाईजान’च्या नव्या लूकवर कमेंट्सचा वर्षाव

'केस कापल्यानंतरही तो मीडियासमोर कॅप लावून येत नाहीये. यासाठी त्याचं कौतुक केलं पाहिजे', असं एकाने लिहिलं आहे. तर 'भाईजान तेरे नाम 2' असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 'जुना सलमान परतला आहे', असंही काहींनी म्हटलं आहे.

Salman Khan | 'जुना सलमान परत आला..'; 'भाईजान'च्या नव्या लूकवर कमेंट्सचा वर्षाव
Salman Khan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 10:14 AM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. 14 ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. हा शो संपल्यानंतर सलमानने सर्वांत आधी त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. नुकताच पापाराझींनी त्याच्या या नव्या लूकचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सलमानचा हा नवीन लूक पाहून चाहत्यांच्या त्याच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातील भूमिकेची आठवण झाली. सोशल मीडियावर सध्या त्याच्या या नव्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. सलमान सहसा त्याच्या चित्रपटातील भूमिकांसाठी लूक बदलतो. अन्यथा नेहमी तो त्याच्या कॅज्युअल लूकमध्ये दिसून येतो. त्यामुळे आता मधेच त्याने असा लूक का केला, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये सलमान हाफ स्लीव शर्ट आणि पँटमध्ये दिसून येत आहे. तर त्याचे केस खूप लहान कापलेले पहायला मिळत आहेत. ‘तेरे नाम’ या चित्रपटातील राधेप्रमाणे त्याची ही हेअरस्टाइल आहे. ‘केस कापल्यानंतरही तो मीडियासमोर कॅप लावून येत नाहीये. यासाठी त्याचं कौतुक केलं पाहिजे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘भाईजान तेरे नाम 2’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘जुना सलमान परतला आहे’, असंही काहींनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सलमानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच ‘टायगर 3’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. तर यामध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये कलाकारांची मोठी फौज होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.