KKBKKJ | ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी दमदार वाढ; सलमानला चाहत्यांकडून मिळाली ‘ईदी’

21 एप्रिल रोजी रमजानचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लोक ईदच्या तयारीत व्यस्त होते. म्हणूनच कमाईचा आकडा कमी पहायला मिळाला. मात्र रविवारी कमाईत सकारात्म वाढ झाली.

KKBKKJ | 'किसी का भाई किसी की जान'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी दमदार वाढ; सलमानला चाहत्यांकडून मिळाली 'ईदी'
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 10:09 AM

मुंबई : अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र प्रदर्शनाच्या दिवशी अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. सलमानचा हा चित्रपट पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई करेल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात जेमतेमच कमाई झाली. आज (23 एप्रिल) या चित्रपटाचा तिसरा दिवस आहे. आता ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे.

पहिल्या दिवशी सलमानच्या चित्रपटाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. गेल्या दहा वर्षांत ईदच्या मुहूर्तावर इतकी कमी कमाई करणारा सलमानचा हा पहिला चित्रपट ठरला. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची चांगली कमाई झाली. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत समाधानकारक वाढ पहायला मिळाली. 22 एप्रिल रोजी या चित्रपटाने जवळपास 28.32 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 21 एप्रिल रोजी रमजानचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लोक ईदच्या तयारीत व्यस्त होते. म्हणूनच कमाईचा आकडा कमी पहायला मिळाला. मात्र रविवारी कमाईत सकारात्म वाढ झाली.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाची कमाई-

2010 – दबंग – 14.50 कोटी रुपये 2011 – बॉडीगार्ड – 21.60 कोटी रुपये 2012 – एक था टायगर – 32.93 कोटी रुपये 2014 – किक – 26.40 कोटी रुपये 2015 – बजरंगी भाईजान – 27.25 कोटी रुपये 2016 – सुलतान – 36.54 कोटी रुपये 2017 – ट्युबलाइट – 21.15 कोटी रुपये 2018 – रेस 3 – 29.17 कोटी रुपये 2019 – भारत – 42.30 कोटी रुपये 2023 – किसी का भाई किसी की जान – 15.81 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. सलमानचा हा चित्रपट दोन कारणांसाठी खास मानला जातोय. पहिलं म्हणजे जवळपास तीन वर्षांनंतर सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.