Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “जे जेव्हा घडायचं असतं..”

सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर ते गर्दीलाही जमू देत नाहीयेत.

Salman Khan | धमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला जे जेव्हा घडायचं असतं..
सलमान खानला धमकी देणारा अटक
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:18 AM

मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमानच्या टीमला धमकीचा ई-मेल मिळाला होता. त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली. सलमानच्या घराबाहेर ते गर्दीलाही जमू देत नाहीयेत. धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या धमकीप्रकरणी आता सलमानची प्रतिक्रिया समोर आली आहे. या सर्व घटनेवर त्याची प्रतिक्रिया काय होती, याबाबतचा खुलासा त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने केला आहे. सलमानचे कुटुंबीय आणि त्याचा जवळचा मित्रपरिवार सुरक्षेबाबत चिंतेत आहे. मात्र सलमानला धमक्यांची कोणतीच भीती नाही, असं त्याने सांगितलं आहे.

धमकीनंतर सलमानच्या स्वभावात काही बदल झाला नाही. तो नेहमीप्रमाणेच वागतोय किंवा कुटुंबीयांनी काळजी करू नये म्हणून नेहमीसारखं वागण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली. धमकीच्या दबावामुळे त्याच्या कुटुंबीयांनी बाहेर जाण्याचे इतर सर्व प्लॅन्स रद्द केले आहेत. इतकंच नव्हे तर शूटिंग आणि प्रमोशनसुद्धा थांबवलं आहे.

सलमानला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पसंत नाही. मात्र या कठीण काळात संपूर्ण कुटुंबीय त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. सलमानचे वडील सलीम खानसुद्धा शांत आहेत. मात्र मनातल्या मनात त्यांना मुलाविषयी काळजी वाटत असल्याचं संबंधित व्यक्तीने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सलमानच्या मित्राने सांगितलं, “त्याच्या मते या धमकीला जितकं लक्ष दिलं जाईल, तितकंच लक्ष आपण धमकी देणाऱ्या व्यक्तीवर देतोय. यामुळे आपला प्लॅन यशस्वी ठरला असं त्याला वाटेल. मात्र सलमान खान निडर आहे. ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या असतात, त्या तेव्हा घडतात, असं त्याचं म्हणणं आहे. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे तो सर्व गोष्टींचं पालन करतोय.”

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला हवी सलमानची माफी

सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला तुरुंगातून धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने 1998 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानकडे माफीची मागणी केली. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्याने दिला. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, असं लॉरेन्स म्हणाला.

सलमानला शस्त्र बाळगण्याची परवानगी

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत. दिल्ली पोलिसांनी सलमानच्या धमकीप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी केली होती. मात्र त्याने साफ नकार दिला होता

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.