‘बिग बॉस’ स्पर्धकाला सलमानशी पंगा घेणं पडलं महागात; तुरुंगात काढले दिवस, आयुष्य संपवण्याचाही केला प्रयत्न

जुबैर आता एक छोटा हॉटेल चालवतो. सलमानसोबतच्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर हळूहळू का होईना पण आयुष्य पूर्वपदावर येईल, अशी आशा त्याने या मुलाखतीत व्यक्त केली. बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये जुबैरचा आक्रमक स्वभाव सलमानला अजिबात आवडला नव्हता.

'बिग बॉस' स्पर्धकाला सलमानशी पंगा घेणं पडलं महागात; तुरुंगात काढले दिवस, आयुष्य संपवण्याचाही केला प्रयत्न
सलमान खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 12:54 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : बिग बॉस या वादग्रस्त आणि तितक्याच लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये असे बरेच स्पर्धक पहायला मिळाले, जे फक्त कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत राहिले. या शोच्या अकराव्या सिझनमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने थेट सलमान खानशी पंगा घेतला. हा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून जुबैर खान आहे. त्याने सलमानला धमकी दिली होती आणि त्यामुळे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर जुबैरचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. आता सहा वर्षांनंतर जुबैरने संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलं आहे. अनेकदा परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचा खुलासा जुबैरने केला.

जुबैर खान रागाच्या भरात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता आणि सलमानला धमकी दिल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर तो कॅमेरासमोर फार क्वचित आला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर त्याने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्यात त्याच्यासोबत जे काही घडलं, त्याविषयीचा खुलासा केला. जुबैरने सांगितलं की सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर त्याची परिस्थिती आणखी वाईट झाली होती. त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर जुबैरला कोणीत काम द्यायला तयार नव्हतं. त्याचदरम्यान जुबैरच्या आईचं निधन झालं.

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत जुबैर म्हणाला, “सलमान भाईने माझ्यासमोर कोणताच मार्ग सोडला नव्हता. मला अप्रत्यक्षपणे इंडस्ट्रीतून हाकलून दिलं होतं. सलमानने मला नल्ला डॉन म्हटलं होतं. त्याच्या वकिलांनी मला खोट्या केसमध्ये अडकवलं आणि तुरुंगात पाठवलं. या सर्व वादादरम्यान मी माझ्या आईलाही गमावलं होतं. गेल्या 16 वर्षांपासून मी नैराश्यात आहे आणि आईच्या निधनानंतर मी पूर्णपणे खचलो होतो. मला सतत आत्महत्येचे विचार यायचे. मी दोन-तीन वेळा टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र ते प्रयत्नही फसले.”

जुबैर आता एक छोटा हॉटेल चालवतो. सलमानसोबतच्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर हळूहळू का होईना पण आयुष्य पूर्वपदावर येईल, अशी आशा त्याने या मुलाखतीत व्यक्त केली. बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये जुबैरचा आक्रमक स्वभाव सलमानला अजिबात आवडला नव्हता. जुबैरने एका महिला स्पर्धकाला ‘दो रुपीज वुमन’ असं म्हटलं होतं. ही गोष्ट सलमानला अजिबात आवडली नव्हती. त्याने जुबैरची सर्वांसमोर शाळा घेतली आणि त्याला ‘नल्ले डॉन’ असं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर सलमानने त्याला तीव्र शब्दांत इशारासुद्धा दिला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.