Salman Khan | ‘कोण आहे ती?’ मध्यरात्री ‘या’ महिलेला सलमान खानने वाहिली श्रद्धांजली; कमेंट्समध्ये प्रश्नांचा भडिमार
सलमान खान याच्या आयुष्यातील 'ही' महिला आहे तरी कोण? जिला भाईजानने मध्यरात्री वाहिली श्रद्धांजली आणि म्हणाला, 'लव्ह यू...' सध्या सर्वत्र सलमान खान याच्या पोस्टची चर्चा
मुंबई : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्याला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण सलमान खान याच्या खासगी आयुष्यात अनेक चढ – उतार आले. पण सलमान खान याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सलमान खान याला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. आजही अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून सलमान त्याच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मध्यरात्री सलमान खान याने एका महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मध्यरात्री एका महिलेला श्रद्धांजली वाहत अभिनेत्याने भावना देखील व्यक्त केल्या आहेत. महिलेचा फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना तुम्ही दिलेल्या त्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद… तुमच्यासाठी भरपूर प्रेम… रेस्ट इन पीस माझी प्रिय अद्दू…’ सध्या सर्वत्र सलमान खान याच्या पोस्टची चर्चा रंगताना दिसत आहे.
सध्या सलमान खान याची सोशल मीडियावर पोस्ट सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. अशात अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते कमेंट करत ‘ती महिला कोण आहे?’ असे प्रश्न विचारत आहे. सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. पण सलमान खान याच्या आयुष्यातील अद्दू कोण आहे? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला विचारला आहे.
सलमान खान याच्या पोस्टमध्या दिसणारी महिला अभिनेत्याची केअर टेकर असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत अभिनेत्याने काहीही स्पष्ट केले नसले तरी याबाबत ठोस काहीही सांगता येत नाही. सलमान खान याच्या पोस्टवर असंख्य चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेत्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. पण सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकला नाही. सिनेमाने १० दिवसांत फक्त १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. ज्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी निराशा व्यक्त केली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ नंतर सलमान खान ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.