Salman Khan | भाईजानने बहिणीचं केलं कन्यादान; पण ‘या’ अभिनेत्याने सलमानच्या लाडक्या बहिणीची केली फसवणूक

सलमान खान याच्या बहिणीची प्रसिद्ध अभिनेत्याकडून फसवणूक... लग्नाच्या एका वर्षानंतर घटस्फोट.. भाईजानच्या बहिणीचा पहिला पती आता 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Salman Khan | भाईजानने बहिणीचं केलं कन्यादान; पण 'या' अभिनेत्याने सलमानच्या लाडक्या बहिणीची केली फसवणूक
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 10:50 AM

मुंबई | अभिनेता सलमान खान कायम त्याच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना दिसतो. एवढंच नाही तर, भावंडांच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारात देखील सलमान कायम त्यांच्यासोबत असतो. सलमान खान कायम त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता अभिनेता त्याच्या लाडक्या बहिणीमुळे चर्चेत आला आहे.. सलमान खान याची बहीण म्हटलं की अर्पिता हिचं नाव समोर येत. पण सलमान खान याच्या एका बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सलमान याची आणखी एक मानलेली बहीण आहे. जिचं लग्न देखील सलमान खान याने मोठ्या थाटात लावून दिलं. पण भाईजानच्या बहिणीचं लग्नाच्या एका वर्षानंतर घटस्फोट झाला..

अभिनेता सलमान खान याच्या मानलेल्या बहिणीचं नाव श्वेता रोहिरा असं आहे. बॉलिवूड अभिनेता पुलकीत सम्राट याने सलमानच्या बहिणीसोबत लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. आता भाईजानच्या बहिणीचा पहिला पती बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे..

पुलकीत याने त्याच्या करियरची सुरुवात २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतून केली. त्यानंतर अभिनेत्याने छोट्या पडद्याचा निरोप घेत रुपेरी पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. पुलकीत याने ‘बिट्टू बॉस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुलकीत याने कधीही मागे वळून पाहिलं नाही..

पहिल्या सिनेमानंतर पुलकीत २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘फुकरे’ सिनेमानंतर अभिनेता ‘डॉली की डॉली’, ‘बंगिस्तान’, ‘सनम रे’, ‘फुकरे रिटर्न्स’ ,’वीरे दी वेडिंग’ आणि ‘पागलपंती’ या सिनेमांमध्ये देखील झळकला.. पुलकीत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहीला.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्याची ओळख सलमान खान याच्या बहिणीसोबत झाली. ओळखीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं आणि दोघांनी गोव्यात २०१४ मध्ये लग्न केलं. लग्नात श्वेताचं कन्यादान देखील सलमान खान याने केलं. पण पुलकीत आणि श्वेता यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला..

घटस्फोटानंतर अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबत देखील पुलकीत याचं नाव जोडण्यात आलं. पण यामी आणि पुलकीत यांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. यामी हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर पुलकीत याच्या आयुष्यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कृती खरबंदा हिची एन्ट्री झाली. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. शिवाय पुलकीत याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.