सलमान खानचं कंगनाच्या मुलांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘कंगनाचा मुलगा, मुलगी दुसरंच काही…’
Salman Khan: 'कंगनाचा मुलगा, मुलगी दुसरंच काही...', बॉलिवूड आणि राजकारणात अभिनेत्री कंगना रणौतचा बोलबाला, सलमान खानने अभिनेत्रीवर साधला निशाणा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा...

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता भाईजान आगामी सिनेमामुळे चर्चेत आला आहे. सलमान खान स्टारर ‘सिंगापूर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेता सिनेमात्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्याव अभिनेत्याने ऑफ कॅमेऱ्या अनेक गोष्टींवर मौन सोडलं आहे. ज्यामध्ये घराणेशाहीवर देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री कंगना रणौत यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
सेल्फ मेड स्टार होण्याबद्दल अभिनेत्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘या जगात कोणीच सेल्फ मेड नाही. मी यावर विश्वास ठेवत नाही. टीम वर्कला मी अधिक महत्त्व देतो. जर माझे वडील मुंबईत आले नसते, त्यांनी सिनेमांमध्ये काम केलं नसतं. तर मी आज शेती करत असते. वडिलांनी माझ्यासाठी मार्ग तयार केला.’
‘माझे वडील मुंबईत आले. अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मी त्यांचा मुलगा आहे. मी देखील इंडस्ट्रीत काम करत राहिलो. लोकांनी याला नाव दिलं घराणेशाही (नेपोटिजम), जे मला फार आवडलेलं आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
याच वेळी सलमान खान याला अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी हिच्याबद्दल विचारण्यात आलं. पण सलमानला वाटतं रवीना नाही तर, कंगना यांच्याबद्दल विचारत आहेत. अभिनेता हैराण होत म्हणाला, ‘कंगनाची मुलगी येत आहे?’
‘कंगनाची मुलगी येणार असेल तर, तिने राजकारण किंवा अभिनय क्षेत्रात काम करेल.’ यावर पत्रकारांनी सलमान खान याला नपोटिझनबद्दल विचारलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘असं असेल तर, कंगना यांनी मलगी असो किंवा मुलगा… त्यांना वेगळं काही तरी करावं लागेल…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
यावेळी सलमान खानने लोकांना चित्रपटगृहात येऊन सिनेमा पाहण्याचम आवाहन केलं. अभिनेता म्हणाला, “मला आशा आहे की जे लोक काम करतात त्यांना ईदच्या दिवशी चांगला बोनस मिळेल जेणेकरून ते सिकंदर आणि मोहनलाल सरांचा L2 Empuran आणि सनी देओलचा ‘जाट’ सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहू शकतील.
‘सिकंदर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भुमिकेत झळकणार आहे. ‘सिकंदर’ सिनेमातून दोघे पहिल्यांदांच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘सिकंदर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.