Salman Khan धमकी प्रकरणात मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी थेट ब्रिटन सरकारला पाठवलं पत्र

अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचं ब्रिटन कनेक्शन... मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर समोर येणार सत्य... धमकी प्रकरणी सर्वत्र खळबळ

Salman Khan धमकी प्रकरणात मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी थेट ब्रिटन सरकारला पाठवलं पत्र
Salman Khan
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 1:36 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला १८ मार्च रोजी जीवे मारण्याची धमकी दिली. एका ई-मेलच्या माध्यमातून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. भाईजानला धमकी मिळाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमानला पाठवण्यात आलेल्या धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एक मोठी अपडेट दिली आहे. सलमान खान याला ज्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे, ती व्यक्ती गोल्डी ब्रार असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इंटरपोलचं सहकार्य घेतलं आहे. सध्या पोलीस सलमान खान धमकी प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; मुंबई पोलिसांनी कायदेशीर मार्गांद्वारे ब्रिटन सरकारला विनंती पत्र पाठवलं होतं. पत्रात पोलिसांनी संबंधीत माहिती जोडली आहे. ज्यामध्ये UK मधील ठिकाणाचा उल्लेख आहे ज्या ठिराणाहून सलमान खानला जीवे मारण्याचा ई-मेल पाठवला गेला आहे.

यासोबतच मुंबई पोलिसांनी यूके सरकारला आयपी अॅड्रेसही पाठवला आहे. गोल्डी ब्रारने हा ई-मेल पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, ब्रिटन सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर, नक्की प्रकरण काय आहे..समोर येईल.. त्यानंतर मुंबई पोलीस गोल्डीला भारतात आणण्याचा प्रयत्न करतील. असं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वी ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अभिनेत्याला धमकीचा मेल आल्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना देखील सतर्क राहण्यास सांगितलं होतं. शिवाय अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. सलमानला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहू नकोस अशी सूचना देण्यात आली आहे.

धमकीच्या ईमेल अगोदर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने जेलमधून एका मुलाखती वेळी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांनी वाढ केली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला Y + दर्जाची सुरक्षा दिली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलवारला धमकीचा एक ई-मेल मिळाला होता. या ई-मेलमध्ये सलमानशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. हा ई-मेल रोहित गर्ग नावाच्या एका व्यक्तीने पाठवला होता. याप्रकरणी रोहित गर्ग, लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या विरोधात एफआरआय दाखल केली आहे. लॉरेंस बिश्नोई याने याआधी देखील एका व्हिडीओमध्ये सलमान खान याला धमकी दिली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.