सलमान खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत, अंबानींच्या लग्नात ‘या’ 5 सेलिब्रिटींचं रीयूनियन
Anant Ambani - Radhika Merchant Wedding: अंबानींच्या लग्नात अनेक चेहरे दिसले एकत्र, फक्त सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावरच नाही तर, 'या' 5 रीयूनियनवर देखील होत्या अनेकांच्या नजरा..., सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल
भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांचं जगातील महागड्या लग्नापैकी एक लग्न होतं. लहान मुलाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबियांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. शिवाय अनेक सेलिब्रिटींना देखील लग्नासाठी आमंत्रित केलं. अंबानीच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या एकाच छताखाली पाहायला मिळाले. अंबानींच्या लग्नात फक्त अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी नाही तर, अन्य सेलिब्रिटींनी देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं…
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन
‘जोधा अकबर’ आणि ‘धूम 2’ सिनेमांमध्ये ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. ‘धूम 2’ सिनेमात अभिषेक देखील होता. आता अनेक वर्षांनंतर तिघांना अंबानींच्या लग्नात पाहाण्यात आलं. तिघांचा एका फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिघांना एकत्र पाहिल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हृतिक – अभिषेक यांनी ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ सिनेमात देखील एकत्र काम केलं होतं.
View this post on Instagram
सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा
‘दबंग’ सिनेमामुळे बॉलिवूडला नवीन जोडी मिळाली आणि ती म्हणजे सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांची… मोठ्या पडद्यावर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांना एकत्र पाहिल्यानंतर अंबानींच्या लग्नात देखील दोघे एकत्र आले. त्यांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत अभिनेता संजय दत्त आणि झहीर इक्बाल देखील आहेत.
अमिताभ बच्चन – रजनीकांत
अमिताभ बच्चन – रजनीकांत यांचं सिनेविश्वात असलेलं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. आजही मोठ्या पड्यावर दोघांना पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अंबानींच्या लग्नात भेटल्यानंतर रजनीकांत यांनी बिग बी यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. दोघांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमान खान – शाहरुख खान
सलमान खान – शाहरुख खान 2018 मध्ये अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लग्नात एकत्र डान्स करताना दिसले होते. आता अंबानींच्या लग्नात ‘करण अर्जुन’ गाण्यावर दोघांनी भांडगा केला. ‘भांगडा पा ले’ गाण्यावर दोघे डान्स करताना दिसले. नुकताच दोघांना अंबानींच्या लग्नात एकत्र पाहण्यात आलं.
शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी
अंबानींच्या लग्नात शाहिद कपूर – मीरा राजपूत आणि सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी देखील एकत्र दिसले. शाहिद – किआरा यांची ‘कबीर’ सिनेमातील कबीर – प्रिती जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. आता दोघांना अंबानींच्या लग्नात एकत्र स्पॉट करण्यात आलं.