शहनाज गिलनंतर सलमान खान कोणाला देणार मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी
सलमान आता कोणाचा गॉडफादर होणार.... , भाईजान आणखी एका सुंदर तरुणीला देणार मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी, कोण आहे 'ती' भाग्यवान तरुणी?
मुंबई : अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक उभरत्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. सलमान खान फक्त चाहत्यांचा ‘भाईजान’ नसून अनेकांचा गॉडफादर आहे. बिग बॉसमध्ये प्रसिद्धीझोतात आल्यानंतर सलमान याने अभिनेत्री शहनाज गिला हिला देखील त्याच्या आगामी सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. आता सलमान खान बिग बॉसमधील आणखी एका स्पर्धकाला त्याच्या सिनेमाटत झळकण्याची संधी देणार आहे. त्यामुळे सलमान आता कोणाचा गॉडफादर होणार असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.
‘बिग बॉस १६’ शोच्या ‘विकेंड का वार’ दरम्यान साजिद खान याने ‘सिनेमात कोणाला संधी देणार?’ असा प्रश्न सलमान खानला विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान म्हणाला, ‘साजिद तुला माहिती आहे बिग बॉसच्या प्रत्येक सीजनच्या स्पर्धकासोबत मी काम करतो. आता अशी संधी मिळाली तर मला प्रियंकासोबत काम करायला आवडेल. ‘
View this post on Instagram
प्रियंकाबद्दल सलमान पुढे म्हणाला, ‘प्रियंकाचं भविष्य उज्वल आहे. तिच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. पुढे जावून प्रियंका टॉप अभिनेत्री होवू शकते.’ असं मत सलमानने प्रियंकाबद्दल मत व्यक्त केलं. सलमान खानच्या वक्तव्यानंतर प्रियंका भाईजानच्या कोणत्या सिनेमात झळकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रियंका चाहर चौधरी बिग बॉसच्या घरातील दमदार स्पर्धकांपैकी एक आहे. विकेंड का वार’मध्ये सलमान याने केलेलं कौतुक ऐकून प्रियंका प्रचंड आनंदी झाली. सलमान अनेकदा प्रियंकाला म्हणला आहे की, तुझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही बदल कर, तू भविष्यात पुढे जाशील. त्यामुळे बिग बॉस संपल्यानंतर प्रियंकाच्या करियरचा ग्राफ किती पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.