Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीशी होणार होतं सलमानचं लग्न, तारीखही ठरली होती; हेरगिरीमुळे संपलं सर्वकाही

सलमाननेही नंतर 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये संगीताची फसवणूक केल्याचा खुलासा केला होता. "एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ होतो. तेव्हाच तिने मला रंगेहात पकडलं होतं. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या", असं सलमान म्हणाला होता.

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीशी होणार होतं सलमानचं लग्न, तारीखही ठरली होती; हेरगिरीमुळे संपलं सर्वकाही
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीशी होणार होतं सलमानचं लग्न, तारीखही ठरली होतीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 12:24 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि लग्न हा विषय काही नवीन नाही. सलमान कधी आणि कोणाशी लग्न करणार, हा सवाल आजही अनुत्तरितच आहे. मात्र इंडस्ट्रीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. ऐश्वर्या राय आणि सलमानचं अफेअर तर जगजाहीर आहे. पण त्याशिवाय सलमानच्या आयुष्यात अशीही एक अभिनेत्री होती, जिच्यासोबत त्याच्या लग्नाची तारीखसुद्धा ठरली होती. त्याच्या कुटुंबीयांनीही दोघांच्या लग्नाला आनंदाने परवानगी दिली होती. मात्र अभिनेत्रीच्या हेरगिरीमुळे मोठा खुलासा झाला आणि त्यानंतर तिने सलमानसोबतचं लग्न मोडलं. नंतर त्या अभिनेत्रीने क्रिकेटरशी लग्न केलं. आता बऱ्याच वर्षांनंतरही सलमान आणि त्या अभिनेत्रीमध्ये मैत्री कायम आहे.

लग्नपत्रिकाही छापल्या

सलमानसोबत जिच्या लग्नाची तारीख ठरली होती, ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून संगीता बिजलानी आहे. ‘त्रिदेव’ या चित्रपटातील ‘गली गील मैं फिरता है’ हे सुपरहिट गाणं तुम्ही ऐकलंय असेल. याच गाण्यात संगीता झळकली होती. त्रिदेवशिवाय गुनाहों का देवता, विष्णु देवा, युगंधर यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं. संगीता आणि सलमानच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली होती, लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या मात्र लग्नाच्या महिनाभरा आधी संगीताने नातं मोडलं.

सलमान-संगीताची मैत्री

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सलमान शाहीन जाफरीला डेट करत होता. शाहीन ही अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी आहे. सलमान आणि शाहीद अनेकदा मुंबईच्या हॉटेलस सी-रॉक हेल्थ क्लबमध्ये जायचे. संगीता बिजलानीसुद्धा त्या क्लबची रेग्युलर मेंबर होती. त्यावेळी संगीताचं नुकतंच अभिनेता बिंजू अलीशी ब्रेकअप झालं होतं. एकेदिवशी संगीताची भेट सलमानशी झाली. त्यावेळी ती बॉलिवूडमध्ये स्टार होती आणि सलमानने अद्याप पदार्पण केलं नव्हतं. संगीताने सलमानचे वडील सलीम खान यांनी लिहिलेल्या ‘जुर्म’ चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे दोघांना मैत्री करायला फार वेळ लागला नाही.

हे सुद्धा वाचा

लग्नाची तारीख

संगीता आणि सलमान यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. 1989 मध्ये सलमानचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर दोघं लग्नाचा विचार करू लागले. दोघांच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला परवागनी दिली होती. इतकंच नव्हे तर संगीता आणि सलमानच्या लग्नाची तारीखसुद्धा ठरली होती. ही तारीख होती 27 मे 1994. लग्नपत्रिका छापण्यास सुरुवात झाली होती आणि लग्नाला फक्त महिना बाकी होता. मात्र त्याचवेळी संगीताला सलमानच्या काही गोष्टी खटकू लागल्या होत्या.

अभिनेत्रीने केला सलमानचा पाठलाग

सलमानच्या बदलत्या स्वभावामुळे तिने त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यातूनच तिला धक्कादायक बातमी समजली. सलमान त्यावेळी गुपचूप अभिनेत्री सोमी अलीला डेट करत होता. हे समजल्यानंतर संगीताने लग्न मोडलं. जासिम खान यांनी लिहिलेल्या ‘बीईंग सलमान’ या पुस्तकात याचा खुलासा करण्यात आला आहे. संगीताने एका मुलाखतीत म्हटलं होतं, “लग्नाच्या महिनाभरापूर्वी मला समजलं होतं की काहीतरी गडबड नक्की आहे. मी त्याचा पाठलाग सुरू केला आणि समजलं की तो लग्नाच्या लायकच नाही. लग्नच काय तर तो बॉयफ्रेंडच्याही लायकीचा नाही. माझ्यासाठी तो सर्वांत वाईट अनुभव होता, मी खूप खचले होते.”

सलमानची कबुली

सलमाननेही नंतर ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये संगीताची फसवणूक केल्याचा खुलासा केला होता. “एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ होतो. तेव्हाच तिने मला रंगेहात पकडलं होतं. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या”, असं सलमान म्हणाला होता. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर संगीताने प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं. त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.