Salman Khan वाढदिवसाच्या दिवशी अडकणार विवाहबंधनात? लक्षवेधी पोस्टमुळे सर्वत्र चर्चा

Salman Khan | 'भाईजान को जान मिल गई...', वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान चढणार बोहल्यावर? वयाच्या ५७ व्या वर्षी सलमान खान करणार नव्या आयुष्याला सुरुवात? अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहते हैराण... काय आहे सत्य?

Salman Khan वाढदिवसाच्या दिवशी अडकणार विवाहबंधनात? लक्षवेधी पोस्टमुळे सर्वत्र चर्चा
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 3:26 PM

मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचं विषय निघाला, तर त्यामध्ये अभिनेता सलमान खान याचं नाव अव्वल स्थानी असतं. अशात सलमान खान याला कायम विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, ‘भाईजान लग्न कधी करणार?’ आता सलमान खान याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये सलमान याच्यासोबत एक मुलगी दिसत आहे. फोटोमध्ये मुलीची पाठ दिसत असल्यामुळे ती कोण आहे याची ओळख पटू शकलेली नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहून सलमान खान वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान बोहल्यावर चढणार अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे.

फोटोमध्ये सलमान खान आणि त्याच्यासोबत असणारी मुलगी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. अभिनेत्यासोबत असलेल्या मुलीच्या कपड्यांवर सलमान खान याच्या वाढदिवसाची तारीख लिहिली आहे. शिवाय फोटोवर ‘उद्या माझ्या प्रेमाचा एक छोटासा तुकडा शेअर करणार आहे..’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर अभिनेत्याने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाही तर सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सलमान खान याची एक्स – गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानी हिने देखील कमेंट केली आहे. ‘Love this…’ असं संगीता हिने कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे. एक चाहता सलमान याच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘भाईजान को जान मिल गई…’, दुसरा चाहता म्हणाला, ‘सलमान खान लग्न करणार आहे?’ असं अनेक प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत.

सलमान खान याचा वाढदिवस २७ डिसेंबर रोजी आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी अभिनेता चाहत्यांना कोणती आनंदाची बातमी देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान खान याच्यासोबत कोण आहे.. याचा खुलासा होईल.. अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

सलमान खान याचा आगामी सिनेमा

सलमान खान लवकरच ‘टायगर 3’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.