AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर प्राणघातक हल्ला, डॉक्टरांकडून हेल्थ अपडेट समोर

Salman Khan Ex-Girlfriend: सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड जखमी, अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला... डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट, अभिनेत्री पोलिसांसोबत करते असं काम..., सर्वत्र चर्चांना उधाण

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर प्राणघातक हल्ला, डॉक्टरांकडून हेल्थ अपडेट समोर
| Updated on: Nov 14, 2024 | 12:04 PM
Share

Salman Khan Ex-Girlfriend: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, सोमी अली हिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मानवी तस्करीचा बळी ठरलेल्या एका महिलेचा जीव वाचवताना अभिनेत्रीचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र सोमी अली हिची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती सोमी अलीने एक मोठा खुलासा केला आहे की, मानवी तस्करीच्या शिकार झालेल्या महिलांचा बचाव करताना अभिनेत्रीवर हल्ला झाला. हल्ल्यात अभिनेत्री गंभीर जखमी झाली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘हाताल फ्रॅक्चर आहे…. प्रचंड वेदना होत आहेत…’

घडलेली घटना सांगत सोमी म्हणाली, ‘मी पोलिसांसोबत पीडितांचा बचाव करण्याचा प्रयत्न करते. मला माझ्या कारमधून बाहेर येण्याची परवागनी नव्हती. पण आता माझा अनुभव फार वेगळा होता कारण आम्ही सर्वे तस्करांच्या प्रतीक्षेत होतो. पीडित महिलेला याची जराही कल्पना नव्हती…’

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

‘पीडित महिलेला वाचवण्यासाठी मी गाडीतून बाहेर निघाले तेव्हा तस्करांनी माझ्यावर हल्ला केला. यामध्ये मला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्णपणे ठिक होण्यासाठी आणखी सहा ते आठ आठवडे लागतील…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सोमी अली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष काम केलं. पण सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी बॉलिवूडपासून दूर झाली. अनेक वर्ष सलमान खान – सोमी अली यांनी एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं फार टिकलं नाही.

सलमान खान याच्या आयुष्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाल्यानंतर सलमान – सोमी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सोमी अली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोमी अली हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.