नाग चैतन्य-शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल; चाहते म्हणाले ‘समंथापेक्षा चांगली पार्टनर..’

परदेशात नाग चैतन्यचं शोभितासोबत व्हेकेशन? समंथाचे चाहते म्हणाले, 'कर्माची फळं..'

नाग चैतन्य-शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल; चाहते म्हणाले 'समंथापेक्षा चांगली पार्टनर..'
नाग चैतन्य-शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 10:52 AM

मुंबई: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांची जोडी घटस्फोटानंतरही अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच समंथाने मायोसिटिस नावाच्या आजाराचा सामना करत असल्याचा खुलासा केला. तिने परदेशात त्यावर उपचार घेतले. तर दुसरीकडे नाग चैतन्यचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबतचा हा फोटो आहे. त्यामुळे एकीकडे समंथा आजारपणात असताना दुसरीकडे नाग चैतन्य मात्र त्याच्या आयुष्यात पुढे गेलाय, अशी टीका समंथाच्या चाहत्यांकडून होत आहे. समंथाच्या चाहत्यांनी नाग चैतन्य आणि शोभिताच्या या फोटोवर नकारात्मक कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नाग चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून आहे. आता हे दोघं परदेशी फिरायला गेले असल्याचं म्हटलं जात आहे. हैदराबादमधील जुबिली हिल्स याठिकाणी नाग चैतन्यने नवीन घर घेतलंय. याच घराजवळ त्याला शोभितासोबत पाहिलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर शोभिताच्या ‘मेजर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती ज्या ज्या हॉटेलमध्ये थांबली, तिथे अनेकदा नाग चैतन्यला पाहिलं गेल्याचंही म्हटलं गेलं. एका मुलाखतीत जेव्हा नाग चैतन्यला शोभिताबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मी फक्त हसणार आहे.”

हे सुद्धा वाचा

आता नाग चैतन्य आणि शोभिताचा हा एकत्र फोटो पाहून समंथाचे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. ‘टाळी एका हाताने वाजत नाही’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘तुला समंथापेक्षा चांगली पार्टनर मिळूच शकणार नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

‘काही महिन्यांपूर्वी जेव्हा समंथाला ट्रोल केलं जात होतं, तेव्हा तू कुठे होतास? शोभिताबद्दल अफवा पसरवल्याचा आरोप तिच्या पीआर टीमवर केला जात होता. पण जे भूतकाळात समंथासोबत झालं, तेच भविष्यात शोभितासोबत होणार आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली. ‘कर्माची फळं नक्कीच मिळणार’ अशीही टीका नाग चैतन्यवर झाली.

कोण आहे शोभिता धुलिपाला?

शोभिता ही अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने हिंदी, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने काही सौंदर्यस्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. ‘फेमिना मिस इंडिया अर्थ 2013’चा किताब तिने पटकावला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं आणि त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेली ‘मेड इन हेवन’ ही तिची सीरिज विशेष गाजली.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.