Samantha Ruth Prabhu हिचा फोटो पाहून चाहते चिंतेत, रुग्णालयात का पोहोचली अभिनेत्री?

समंथा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... पण आता अभिनेत्रीची प्रकृती पाहून चाहते चिंतेत... फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली...

Samantha Ruth Prabhu हिचा फोटो पाहून चाहते चिंतेत, रुग्णालयात का पोहोचली अभिनेत्री?
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 3:20 PM

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता नागा चैतन्यसोबत विभक्त झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक मोठे खुलासे समोर आले. घटस्फोटानंतर चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेत्रीच्या आजाराची. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या आजाराबद्दल चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर चाहत्यांनी देखील अभिनेत्रीसाठी प्रर्थना केली. आता देखील अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीची प्रकृती पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. समंथाला काय झालं आहे. ती रुग्णालयात का पोहोचली असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहे. खुद्द अभिनेत्रीने तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्रीचा फोटो पाहिल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत.

समंथाचा फोटो पाहिल्यानंतर चाहते घाबरले आहेत. पण घाबरण्याचं आणि चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण अभिनेत्रीचा फोटो थेरपी दरम्यानचा आहे. ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ दरम्यान त्यांनी तो फोटो काढला. समांथाचा हा फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले की अभिनेत्रीला नक्की काय झालं. पण घाबरण्यासारखं काही कारण नाही. हा फोटो सामंथाच्या थेरपीच्या दिवसांचा आहे.

समंथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘जसा माझा दृष्टिकोन आहे…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सध्या समंथा तिच्या फोटोमुळे चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शकुंतलम’ सिनेमाच्या पराभवानंतर समंथा आगामी वेब सीरिज ‘सिटाडेल’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राज आणि डीके सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत. सीरिजमध्ये सामंथा आणि वरुण धवन पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

एवढंच नाही तर, अभिनेत्रीचा ‘कुशी’ हा तेलुगु रोमँटिक सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात समंथा अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेत्रीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता फक्त साऊथच नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रचंड प्रसिद्ध आहे.

‘यशोदा’ सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्या भूमिकेत दिसणाऱ्या समंथाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अभिनेत्रीला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंतावा’ या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली. आता समंथा यशाच्या उच्च शिखरावर चढत आहे.

धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.