Sana Khan | इफ्तार पार्टीतील ‘त्या’ कृत्यावर मुफ्ती अनसवर भडकले नेटकरी; अखेर सना खानने दिलं स्पष्टीकरण

सनाने 2020 मध्ये अभिनयविश्वाला कायमचा रामराम केला आणि तिने अनसशी निकाह केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. सना खानने धर्माचं कारण देत अभिनयविश्व सोडलं होतं.

Sana Khan | इफ्तार पार्टीतील 'त्या' कृत्यावर मुफ्ती अनसवर भडकले नेटकरी; अखेर सना खानने दिलं स्पष्टीकरण
Sana KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 10:08 AM

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजानच्या महिन्यात बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टीला सलमान खान, शहनाज गिल, राघव जुयाल, सुभाष घई, चंकी पांडे, रितेश देशमुख, जिनिलिया डिसूझा, एमसी स्टॅन, साजिद खान असे बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते. ग्लॅमर विश्वाला अलविदा केलेल्या सना खाननेही पती मुफ्ती अनससोबत या पार्टीला हजेरी लावली होती. मात्र तिच्या पतीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यावरून मुफ्ती अनसला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. या व्हिडीओमध्ये तो गरोदर सनाला तिथून खेचून घेऊन जाताना दिसत आहे. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर आता सनाने या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये मुफ्ती अनस सनाचा हात पकडून पटापट पुढे चालताना दिसतोय. तर सना त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती थकली आहे आणि पटापट चालू शकत नाही. सनाच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवतोय. हे पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘गरोदर असतानाही तिला अशा पद्धतीने खेचून का घेऊन जातोय’, असा सवाल एकाने केला. तर ‘गर्भवती पत्नीची नीट काळजी घेऊ शकत नाही, मग उपवासाचा काय उपयोग’, असा टोमणा दुसऱ्या युजरने मारला. ‘जर सनाला सर्वांसमोर अशी वागणूक मिळत असेल तर तो घरात तिची काय किंमत ठेवत असेल’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

सना खानचं स्पष्टीकरण-

‘हा व्हिडीओ नुकताच माझ्या निदर्शनास आला. मला माहितीये की माझ्या बंधुभगिनींना किंबहुना मलाही हा व्हिडीओ जरा विचित्रच वाटला. तिथून बाहेर आल्यानंतर आमचा आमच्या ड्रायव्हरशी आणि कारशी संपर्क होऊ शकत नव्हता. मी नेहमीपेक्षा जास्त वेळ उभी होते आणि त्यामुळे मला घाम येत होता. मी अन्कफर्टेबल झाल्याने लवकरात लवकर मला बसायला मिळावं, प्यायला पाणी आणि थोडी मोकळी हवा मिळावी म्हणून ते मला तिथून घेऊन जात होते. तिथून लवकर बाहेर पडण्यासाठी मीच त्यांना सांगितलं होतं, कारण मला तिथल्या पाहुण्यांचे फोटो काढण्यासाठी उभ्या असलेल्या पापाराझींना डिस्टर्ब करायचं नव्हतं. त्यामुळे मी विनंती करते की कृपया दुसरा कोणताही विचार करू नका. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी मी तुमचे आभार मानते,’ असं तिने स्पष्ट केलं.

सनाने 2020 मध्ये अभिनयविश्वाला कायमचा रामराम केला आणि तिने अनसशी निकाह केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. सना खानने धर्माचं कारण देत अभिनयविश्व सोडलं होतं. ग्लॅमरच्या विश्वात यश मिळूनही मानसिक समाधान कधीच मिळालं नसल्याचं तिने म्हटलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.