Sania Mirza: ‘आयुष्य खराब झालंय…’, सानिया मिर्झाने घटस्फोटानंतर मुलांसाठी लिहिली भावुक पोस्ट

Sania Mirza: शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नानंतर खचली सानिय मिर्झा? घटस्फोटानंतर मुलांसोबत खास फोटो, भावुक पोस्ट करत म्हणाली..., सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिच्या पोस्टची चर्चा... नेटकऱ्यांनी शोएब याच्यावर व्यक्त केला संताप...

Sania Mirza: 'आयुष्य खराब झालंय...', सानिया मिर्झाने घटस्फोटानंतर मुलांसाठी लिहिली भावुक पोस्ट
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 8:44 AM

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. भारतात आणि पाकिस्तानमध्ये सध्या सानिया – शोएब यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानातून देखील शोएब याच्या तिसऱ्या लग्नाला विरोध होत आहे. तर सानिया मिर्झा हिच्या बाजूने संपूर्ण राष्ट्र उभं असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. खुद्द शोएब याने तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तर सानिया मिर्झा हिने मुलांसोबत फोटो पोस्ट केला आहे.

फोटोमध्ये सानिया मुलांसोबत बसलेली दिसत आहे. मुलांसोबत खास फोटो पोस्ट करत सानिया हिने कॅप्शनमध्ये ‘लाईफलाईन’ असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा रंगली आहे. नेटकरी सानिया हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानियाच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सानिया तू काळजी करु नकोस, संपूर्ण राष्ट्र तुझ्यासोबत आहे.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आयुष्य खराब झालं एकामुळे…’ तर अनेकांनी शोएब याच्यावर संताप व्यक्त केला आहे.

सानिया कायम तिचं खासगी आयुष्य गुपित ठेवतं. पण सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सानिया तिच्या भावना चाहत्यांना सांगत असते. शोएब याने तिसरं लग्न केल्यामुळे सानिया चर्चेत आली आहे.

शोएब याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून सानिया हिने पतीला घटस्फोट दिल्याची माहिती समोर येत आहे. सानिया हिच्यासोबत शोएब याचं दुसरं लग्न होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सानिया आणि शोएब यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव इझान आहे.

शोएब मलिक आणि त्याचे अफेअर

आधी मॉडेल आयेशा ओमरसोबत शोएबचं नाव जोडलं जात होते. दोघांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र तिने या चर्चा फेटाळल्या होत्या. सांगायचं झालं तर, 2022 पासून शोएब याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. 2010 मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं लग्न झालं होतं.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.