घटस्फोटानंतर सानियाची काळीज हेलावणारी पोस्ट; म्हणाली, ‘जेव्हा जग जिंकत होते, तेव्हा लोकं म्हणाले संसार…’

Sania Mirza : यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतर महिलांना करावा लागतो नको त्या गोष्टींचा सामना! सानिया मिर्झा हिने देखील करियर, लग्न, घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र सानियाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्टच्या माध्यमातून सानियाने व्यक्त केल्या मनातील भावना

घटस्फोटानंतर सानियाची काळीज हेलावणारी पोस्ट; म्हणाली, 'जेव्हा जग जिंकत होते, तेव्हा लोकं म्हणाले संसार...'
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 11:47 AM

मुंबई | 2 मार्च 2024 : टेनिस स्टार सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून पकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकताच सानियाने शोएब मलिक याच्यासोबत घोटस्फोटाची घोषणा केली. दरम्यान, घटस्फोटानंतर सानियाने पुन्हा काळीज हेलावणारी पोस्ट केली आहे. एक जाहिरात पाहिल्यानंतर सानियाने महिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टीबद्दल सांगितलं आहे. अर्बन कंपनीची जाहिरात ‘छोटी सोच’वर प्रतिक्रिया देत सानियाने स्वतःच्या आयुष्याबद्दल देखील सांगितलं आहे.

जाहिरातीत एका ब्यूटीशियन महिलेवर आधारलेली आहे. कार खरेदी केल्यानंतर शेजारी आणि लहान भावाच्या अनेक प्रश्नाचा ब्यूटीशियन महिलेला सामना करावा लागतो. जाहिरातीवर सानिया म्हणाली, ‘2005 मध्ये WTA किताब जिंकणारी मी पहिली महिला होती…. ही मोठं यश आहे… आहे ना? जेव्हा मी डबल्सच्या जगातील अव्वल खेळाडू होती, तेव्हा मी संसार कधी थाटणार… हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते.’

हे सुद्धा वाचा

‘सहा ग्रँडस्लॅम जिंकणे समाजासाठी पुरेसे नव्हतं. माझ्या प्रवासात ज्यांनी माझं समर्थन केलं. त्यांची मी आभारी आहे. पण काही गोष्टींचा विचार करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकत नाही. मला आश्चर्य वाटतं की, महिलेचं कौशल्य आणि कामापेक्षा त्यांच्या लैंगीक अपेक्षा आणि देखाव्यांबाबाद चर्चा केली जाते.’

पुढे सानिया म्हणते, ‘अर्बन कंपनीची जाहिरात पाहत आहे. ‘मला माहिती आहे समाजातील वास्तविकतेवर भाष्य करणं कठीण आहे आणि कधीकधी गैरसोयीचं देखील ठरतं. पण आपण महिलांच्या यशासोबत कसं राहू शकतो. यावर आत्मनिरीक्षण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

सांगायचं झालं तर, सानिया मिर्झा हिने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत, तर अनेक नवीन विक्रम रचले आहेत. आज सानियाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. टेनिसविश्वात सानियाचं नाव फार मोठं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा रंगली आहे.

सानियाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब याला घटस्फोट दिल्यानंतर पाच वर्षाच्या मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर शोएब याने तिसरं लग्न केलं. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत शोएबने लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.