तुम्ही विराट कोहली- अनुष्का शर्मा नाही होऊ शकणार, सानिया मिर्झाच्या एक्स पतीवर भडकले लोक, शोएब मलिक आणि सना जावेद…
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये येते. काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक याने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. हे फोटो पाहून लोक हैराण झाले होते.
सानिया मिर्झा हिचा एक्स पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शोएब मलिक याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक याने थेट आपल्या तिसऱ्या लग्नातील फोटो शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. या लग्नानंतर सानिया मिर्झाच्या चाहत्यांनी शोएब मलिकला सोशल मीडियावर तूफान ट्रोल केले. यासोबतच सानिया मिर्झा हिला देखील खडेबोल सुनावताना यावेळी लोक दिसले.
आता नुकताच सना जावेद ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीये. शोएब मलिक याला सपोर्ट करण्यासाठी सना जावेद ही स्टेडियममध्ये दाखल झाली. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. शोएब मलिक याला चीयर करताना सना जावेद दिसत आहे. शोएब मलिक हा देखील मैदानातून पत्नीकडे बघून हातवारे करताना दिसतोय.
सना जावेद आणि शोएब मलिक यांचे हे वागणे लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे बघायला मिळतंय. यावरूनच लोक यांना आता खडेबोल सुनावताना दिसत आहेत. काहीही झाले तरीही तुम्ही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा होऊ शकत नसल्याचे देखील ट्रोलर्सने म्हटले आहे. अनुष्का शर्मा हिची कॉपी सना जावेद करत असल्याचे लोकांनी म्हटले.
एकाने कमेंट करून म्हटले की, मिसेस कोहलीला कॉपी करत आहे ही सना जावेद. दुसऱ्याने लिहिले की, ज्यापद्धतीने अनुष्का शर्मा विराटला चीयर करते तसेच करताना ही देखील दिसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, फालतूमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बनण्याचा प्रयत्न करताना हे दोघे दिसत आहेत. सना जावेद हिने शोएब मलिक याच्यासोबत लग्न केल्यापासून तिला सतत ट्रोल केले जाते.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा एक मुलगा आहे. शोएब मलिक याच्यासोबत लग्न केल्यानंतर सानिया मिर्झा ही भारत सोडून चक्क दुबईमध्ये शिफ्ट झाली होती. हैद्राबादमध्ये अत्यंत खास पद्धतीने शोएब मलिक आणि सानियाचे लग्न झाले. मात्र, शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटावर सानिया मिर्झा हिने एकदाही भाष्य केले नाही. शोएब मलिक याचे अनेक महिलांसोबत संबंध असल्यानेच सानियाने घटस्फोट दिल्याचे सांगितले जाते.