मुसलमान आणि हिंदूंचं नातं कसं?, तुरुंगात कसा साजरा होतो रमजान? संजय दत्त म्हणाला…

रमजानच्या महिन्यात कसं असतं तुरुंगातील वातावरण? मुसलमान आणि हिंदूंचं नातं कसं? अभिनेता संजय दत्त याच्याकडून मोठा खुलासा..., तुरुंगातील वातावरणाबद्दल संजय दत्त याने केलं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र संजूबाबाच्या अनुभवाची चर्चा...

मुसलमान आणि हिंदूंचं नातं कसं?, तुरुंगात कसा साजरा होतो रमजान? संजय दत्त म्हणाला...
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 12:23 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : बॉलिवूड प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता संजय दत्त याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण अभिनेता त्याच्या सिनेमांपेक्षा जास्त वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये काम करत असताना संजय याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आणि अभिनेत्याला तुरुंगात जावं लागलं. अभिनेता कायम तुरुंगातील दिवसांबद्दल चाहत्यांना सांगत असतो. एका मुलाखतीत अभिनेत्याने रमजानच्या महिन्यात तुरुंगातील वातावरण कसं असतं यावर मोठा खुलासा केला आहे.

मुलाखतीत संजय म्हणाला होता, ‘तुरुंगात जेव्हा रमजान साजरा केला जातो, तेव्हा मुसलमांना सकाळी 4 वाजता गरम चाहा दिला जातो. चहासोबत सकाळी नाश्ता देखील मिळतो. तेव्हा मुस्लीम बंधू त्यांच्या हिंदू बांधवांना उठवतात आणि त्यांना देखील चहा देतात. मी तुरुंगात असं वातावरण पाहिलं आहे.

‘तुरुंगात प्रत्येक जण एकीने आणि प्रेमाने राहतो. आपण प्रत्येक जण भारतीय आहोत, अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते. आमच्यामध्ये कधीच कोणता भेदभाव झाला नाही. ‘ असं देखील संजय दत्त एका मुलाखतीत म्हणाला होता. संजय दत्त कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

हे सुद्धा वाचा

संजय दत्त याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लॉस्टमध्ये संजय याला अटक करण्यात आली होती. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या अरोपांखाली संजय याला अटक करण्यात आली होती. ज्यामुळे अभिनेत्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता अभिनेता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांसोबत संजय आनंदी आयुष्य जगत आहे. संजूबाबाच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘केडी-द-डेव्हिल’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

संजय दत्त कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याच्या जुन्या सिनेमांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजही बॉलिवूडमध्ये असलेलं  संजूबाबाचं स्थान अन्य कोणता अभिनेता घेऊ शकलेला नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्त याची चर्चा रंगली आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.