संजय दत्त याच्या एक दोन नाही तर, तब्बल ३०८ गर्लफ्रेंड; संजूबाबा तिला घेऊन कब्रस्तानमध्ये गेला आणि…

तीन लग्न करण्याआधी संजूबाबाच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड; तिला घेवून संजय दत्त कब्रस्तानमध्ये गेला आणि..., अभिनेता असं काही करेल अशी कोणाला अपेक्षा देखील नव्हती

संजय दत्त याच्या एक दोन नाही तर, तब्बल ३०८ गर्लफ्रेंड; संजूबाबा तिला घेऊन कब्रस्तानमध्ये गेला आणि...
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 3:10 PM

Sanjay Datt Love story : ‘मुन्ना भाई एम बी बी एस’, ‘संजू’, ‘खलनायक’, ‘शमशेरा’, ‘अग्निपथ’, ‘पीके’, ‘साजन’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता संजय दत्त चाहत्यांच्या भेटीस आला. आज संजूबाबाच्या चाजहत्यांची संख्या फार मोठी आहे आणि अभिनेत्याचे सिनेमे पाहण्यासाठी देखील सिनेमागृहात चाहत्यांची मोठी गर्दी जमते. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या सिनेमांमुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिला. संजय दत्त (sanjay datt) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर संजूबाबाच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर त्याचा परिणाम झाला. महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले. अभिनेत्याने त्याला ३०८ गर्लफ्रेंड्स असल्याचं देखील सांगितलं.

एवढंच नाही तर, ‘शमशेरा’ (Shamshera) सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान फिल्ममेकर राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी संजूबाबाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला. राजकुमार हिरानी म्हणाले, ‘संजय दत्त याला जी मुलगी आवडायची संजूबाबा तिला घेवून कब्रस्तानमध्ये जायचा…’

राजकुमार हिरानी पुढे म्हणाले, ‘गर्लफ्रेंडला कब्रस्तानमध्ये घेवून गेल्यानंतर संजय आईच्या कबरीवर भावुक व्हायचा पण ती कबर संजयच्या आईची नव्हती. असं केल्यामुळे मुली देखील भावुक व्हायच्या. मुलींना ठावूक नसायचं की संजय खोटं बोलत आहे…’ संजूबाबाच्या आयुष्यातील मोठं सत्य राजकुमार हिरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यानंतर संजय याचे तीन लग्न झाले. पण अभिनेत्याचे पहिले दोन लग्न अपयशी ठरले. त्यानंतर मान्यता हिच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक मुली देखील आल्या. पण मान्यताने कधीही अभिनेत्याची साथ सोडली नाही. कठीण काळात देखील मान्यता संजयसोबत उभी राहिली.

दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मान्यता आणि संजय यांनी हिंदू पद्धतीत लग्न केलं. ११ फेब्रुवारी २००८ मध्ये संजय आणि मान्यता यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींनी दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

लग्नानंतर दोन वर्षांनंतर मान्यता – संजय जुळ्या मुलांचे आई – वडील झाले. मान्यता हिने एक मुलगा आणि मुलीला जन्म दिला. आता संजय पत्नी मान्यता आणि मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. शिवाय अभिनेता कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत कायम प्रेम व्यक्त करताना दिसतो.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.