संजूबाबाच्या ‘या’ बहिणीला कोणीही नसेल पाहिलं; अभिनेत्याने पहिल्यांदा शेअर केला फोटो

संजूबाबाने पहिल्यांदा शेअर केला लाडक्या बहिणीचा फोटो; अभिनेत्याच्या या बहिणीला तु्म्ही पाहिलं आहे?

संजूबाबाच्या 'या' बहिणीला कोणीही नसेल पाहिलं; अभिनेत्याने पहिल्यांदा शेअर केला फोटो
संजूबाबाच्या 'या' बहिणीला कोणीही नसेल पाहिलं; अभिनेत्याने पहिल्यांदा शेअर केला फोटो
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 11:52 AM

मुंबई : अभिनेता संजय दत्त कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. वयाच्या ६३ व्या वर्षातील अभिनेत्याचा फिटनेस अनेक तरुणांना लाजवेल आसा आहे. संजूबाबा कायम सोशल मीडियावर कुटुंबाचे फोटो शेअर करत असतो. आता देखील अभिनेत्याने बहिणीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये संजूबाबा प्रचंड आनंदी दिसत आहे. संजयने बहिण नमृता दत्तासोबत एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे बहिण-भाऊ एकत्र दिसत आहेत. बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्याने खास फोटो शेअर केला आहे.

नमृता दत्तासोबत फोटो शेअर करत त्याने बहिणीला ‘माय सपोर्ट सिस्टम’ म्हटलं आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बहिणीसोबत खास फोटो शेअर करत संजयने कॅप्शनमध्ये, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा अंजू… तू कायम माझी साथ दिली. माझ्यासाठी कायम खंबीरपणे उभी राहिली. तू मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभार…’ असं म्हणत संजूबाबाने बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्तची बहिण नमृता दत्त कायम लाईमलाईट पासून दूर असते. पण आता संजय दत्तने नमृतासोबत फोटो पोस्ट केल्यामुळे संजूबाबची बहिण चर्चेत आली आहे. त्यांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र बहिण-भावाच्या फोटोची चर्चा रंगत आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘सर्वात दुर्मिळ फोटो’, तर अन्य एका युजरने अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. ‘संजूबाबा तुझ्यावर काळा रंग प्रचंड चांगला दिसतो…’ असं म्हटलं आहे.

संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, संजूबाबा नुकताच अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘शमशेरा’ सिनेमात दिसला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमा अपयशी ठरला, पण संजय दत्तच्या भूमिकेचं कौतुक झालं. आता अभिनेता ‘द गुड महाराजा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा नोव्हेंबर २०२३ रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.