Sanjay Dutt | बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर संजूबाबाची लेक परफेक्ट जोडीदाराच्या शोधात; लग्नाबद्दल म्हणाली..

बॉयफ्रेंडच्या निधनानंतर पूर्णपणे खचलेली अभिनेता संजय दत्त याची लेक त्रिशाला दत्ता नव्या जोडीदाराच्या शोधात; लग्नाबद्दल म्हणाली... सध्या सर्वत्र संजूबाबाच्या लेकीची चर्चा...

Sanjay Dutt | बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर संजूबाबाची लेक परफेक्ट जोडीदाराच्या शोधात; लग्नाबद्दल म्हणाली..
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 9:58 AM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : गेल्या काही वर्षांपासून सेलिब्रिटींची मुलं म्हणजे स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी बॉलिवूडवर राज्य केलं आहे आणि आजही करत आहेत. पण अभिनेता संजय दत्त याची मुलगी मात्र झगमगत्या विश्वापासून फार दूर आहे. संजय दत्त आणि अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची पहिली मुलही त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. झगमगत्या विश्वापासून दूर असली, तरी त्रिशाला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

काही दिवसांपूर्वी त्रिशाला हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्क साधला होता. यावेळी चाहत्यांनी संजूबाबाच्या लेकीला लग्नाबद्दल विचारलं. त्रिशाला हिने देखील चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका खास अंदाजात दिली. संजूबाबाची लेक कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

लग्नाबद्दल त्रिशाला म्हणाली, ‘जेव्हा मला उत्तम जोडीदार भेटेल, तेव्हा मी नक्की लग्न करेल. जो मला आदर, सन्मान, प्रेम आणि माझं कौतुक करेल.. ज्यासाठी मी पात्र आहे…’ शिवाय त्रिशाला “हॅप्पी वाइफ, हॅप्पी लाइफ।” असं देखील म्हणाली आहे. सध्या सर्वत्र त्रिशाला हिची चर्चा रंगत आहे.

त्रिशाला ही संजय दत्तची मुलगी आहे, त्यामुळे ती देखील इतर स्टार किड्सप्रमाणे बॉलिवूडमध्ये येईल का? असा प्रश्न देखील चाहते त्रिशाला हिला विचारत असतात. यावर देखील संजूबाबाच्या मुलीने स्पष्ट उत्तर दिलं. त्रिशाला म्हणाली, ‘मी माझा वारसा मागे ठेवून, स्वतःची ओळख निर्माण करण्यात व्यस्त आहे…’ त्यामुळे त्रिशाला बॉलिवूडमध्ये येणार नाही हे स्पष्ट आहे.

एवढंच नाही तर, संजय दत्त यांची मुलगी तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. बॉयफ्रेंडच्या निधनानंतर त्रिशाला पूर्णपणे खचली होती. यावर त्रिशाला म्हणाली, ‘मी अजूनही कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. यासाठी मी खूप मदत घेतली आहे आणि घेत आहे. मी आठवड्यातून एकदा माझ्या थेरपिस्टला भेटतो. यावेळी मी स्वतःचा शोध घेत आहे.’ असं देखील त्रिशाला म्हणाली.

त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. संजूबाबाच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील फेल आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.