पत्नी कर्करोगाचा सामना करत असताना संजय दत्त होता माधुरी दीक्षित हिच्या प्रेमात
कर्करोग ग्रस्त पत्नी नाही तर, संजय दत्त याला होती माधुरी दीक्षित हिची काळजी, पण संजूबाबाच्या कठीण काळात अभिनेत्रीने सोडली साथ

Sanjay Datta And madhuri Dixit : अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शिवाय संजूबाबा अनेकदा वादग्रस्त प्रकरणांमध्ये देखील अडकला. ज्याचा परिणाम अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर झाला. आज संजय दत्त याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांच्या माध्यमातून संजूबाबा चाहत्यांच्या भेटीस आला. महत्त्वाचं त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले. अभिनेत्याने त्याला ३०८ गर्लफ्रेंड्स असल्याचं देखील सांगितलं, त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री मााधुरी दीक्षित. (maduri Dixit)
एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र माधुरी आणि संजय यांच्या नात्याची चर्चा होती. संजय, माधुरी हिच्यावर प्रचंड प्रेम करत होता असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. शिवाय अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम देखील केलं. याचदरम्यान त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. जेव्हा संजूाबाबच्या पहिल्या पत्नीला पतीच्या नात्याबद्दल कळालं तेव्हा तिला प्रचंड वाईट वाटलं.
जेव्हा संजूबाबाचं नाव माधुरी हिच्यासोबत जोडण्यात आलं, तेव्हा अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा कर्करोगाचा सामना करत होती. पतीचे माधुरीसोबत असलेले संबंध कळताच ऋचा अमेरिकेतून भारतात आली. पण उपचारादरम्यान ऋचा हिचं निधन झालं. संजय आणि ऋचा यांना एक मुलगी आहे. (maduri Dixit – sanjay dutt)
या गोष्टीचा खुलासा खुद्द संजय दत्त याची पहिली पत्नी ऋचा हिने एका मुलाखतीत केला होता. ऋचा म्हणाली, संजय याला माधुरी दीक्षित हिने भावनिक पाठिंबा दिला होता. जेव्हा दोघं विभक्त झाले, तेव्हा संजयला प्रचंड वाईट वाटलं. तेव्हा संजय माधुरीवर प्रचंड प्रेम करायचा. पण याबाबत कधीही संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी वक्यव्य केलं नाही. (bollywood love story)
जेव्हा मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटात संजय दत्त याचं नाव पुढे आलं, तेव्हा माधुरी दीक्षित हिने संजूबाबाची साथ सोडली. तेव्हा पासून कधीही दोघे एकत्र आले नाही. आता संजय दत्त आणि माधूरी दीक्षित त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. (affairs relationships)
संजय दत्त कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. एवढंच नाही तर, अनेक चढ-उतार अभिनेत्याच्या आयुष्यात आले. पण कोणत्याही प्रसंगाचा सामना संजूबाबाने मोठ्या धैर्याने केला. वाद आणि संजय दत्त यांचं जुनं नातं आहे. तर दुसरीकडे संजूबाबाच्या अफेअरबद्दल देखील तुफान चर्चा रंगल्या.
