हैदराबाद येथील महाराजांच्या नातीसोबत संजय दत्तचं दुसरं लग्न; तुरुंगात सुरू झाली ‘प्रेमकहाणी’

कठीण काळात तिने कधीही सोडली नाही संजूबाबाची साथ; तुरुंगात सुरू झालेल्या 'प्रेमकहाणी'चा अंत धक्कादायक... संजूबाबाच्या खासगी आयुष्यातील मोठं सत्य...

हैदराबाद येथील महाराजांच्या नातीसोबत संजय दत्तचं दुसरं लग्न; तुरुंगात सुरू झाली 'प्रेमकहाणी'
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 3:03 PM

Sanjay Dutt love life : अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. एवढंच नाही तर, अनेक चढ-उतार अभिनेत्याच्या आयुष्यात आले. पण कोणत्याही प्रसंगाचा सामना संजूबाबाने मोठ्या धैर्याने केला. वाद आणि संजय दत्त यांचं जुनं नातं आहे. तर दुसरीकडे संजूबाबाच्या अफेअरबद्दल देखील तुफान चर्चा रंगल्या. संजय दत्त याची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अभिनेत्याची दुसरी पत्नी रिया पिल्लाई (rhea pillai) यांच्या नात्याबद्दल देखील फार चर्चा रंगल्या. त्यानंतर संजय आणि रिया यांनी १४ फेब्रुवारी रोजी लग्न केलं.

संजयच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. ड्रग्ज प्रकरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप आणि अफेअरमुळे अभिनेता चर्चेत आला. संजयचं पहिले लग्न 1987 मध्ये अभिनेत्री रिचा शर्मासोबत झालं. लग्नानंतर रिचाने इंडस्ट्री सोडली. रिचा आणि संजय यांना त्रिशाला नावाची मुलगी असून ती अमेरिकेत राहते. रिचाला कॅन्सर झाला होता, ज्यामुळे 1996 मध्ये तिचं निधन झालं.

हे सुद्धा वाचा

रिचाच्या मृत्यूनंतर संजय याच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजयच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लई हिची एन्ट्री झाली. दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयला तुरुंगात जावं लागलं तेव्हा संजूबाबा आणि रिया यांच्यातील नातं आणखी घट्ट झालं. (sanjay dutt love story)

संजूबाबा तुरुंगात असताना रिया हिने कधीच संजय दत्त याची साथ सोडली नाही. रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. कठीण काळात साथ दिल्यामुळे संजय याच्या मनात रिया हिच्याबद्दल प्रेम आणि सन्मान अधिक वाढला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं.

लग्नानंतर अभिनेत्याने सात सिनेमे साइन केले होते. त्यामुळे संजूबाबाकडे रियासाठी वेळ नव्हता. म्हणून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. पण रिपोर्टनुसार तेव्हा संजय आणि मान्यता यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या, तर दुसरीकडे रियाने टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करायला सुरुवात केली. अशात संजय आणि रिया यांच्यात वाद सुरु झाले.

अखेर संजय आणि रिया यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यासिर उस्मानने त्यांच्या ‘द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय संजय दत्त’ पुस्तकातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे.

पुस्तकात लिहिलं आहे की, ‘बॉलीवूडमधील प्रत्येकाला वाटत होते की संजय दत्तची फसवणूक झाली आहे, परंतु संजय दत्तने घटस्फोटाच्या बदल्यात रिया पिल्लईला वांद्रे येथे दोन फ्लॅट्सही दिले शिवाय, देजा वु एंटरटेनमेंट आणि ग्लोबल एंटरटेनमेंट या दोन कंपन्यांचे शेअर्सही रियाच्या नावावर होते. आता संजूबाबा पत्नी मान्यता आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.