Karisma Kapoor हिला घटस्फोटानंतर पहिल्या पतीकडून महिन्याला मिळतात बक्कळ पैसे; आकडा हैराण करणारा
Karisma Kapoor हिला घटस्फोटानंतर संजय कपूर याच्याकडून मिळतात बक्कळ पैसे; महिन्याला मिळणाऱ्या रकमेचा आकडा थक्क करणारा

मुंबई : ९० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर (Karisma Kapoor). करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र कपूर कुटुंबाची लेक आणि अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. करिश्मा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत राहिलं. यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं, पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने आईच्या इच्छेनुसार उद्योगपती संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. अखरे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्री करिश्माने श्रीमंत उद्योजका संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अभिनेत्री अनेक भयानक अनुभव आले. आलेल्या अनुभवांबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. लग्नानंतर संजय याने हनीमूनच्या रात्री मित्रांसोबत करिश्माची बोली लावली. करिश्मा आणि संजय यांचं लग्न अभिनेत्रीची आई बबिता यांच्या हट्टामुळे झालं असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.
करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट सर्वात महाग घटस्पोट म्हणून ओळखला जातो. घटस्फोटासाठी संजय कपूर याला मोठी रक्कम मोजावी लागली.
रिपोर्टनुसार, जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा संजय कपूर याने करिश्मा कपूर हिला १४ कोटी रुपये दिले. बक्कळ पैशांसोबत पहिल्या पतीने अभिनेत्रीला भव्य घर देखील दिलं. घटस्फोटानंतर संजय कपूर मुलांसाठी दर महिन्याला तब्बल १० लाख रुपये देतो. दोघांच्या घटस्फोटाचं कारण म्हणजे, लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले.
घटस्फोटानंतर करिश्माने कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्री आज दोन मुलांचा सांभाळ एक ‘सिंगल मदर’ म्हणून करते. अनेकता करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत अनेक ठिकाणी पोहोचते. शिवाय सोशल मीडियावर देखील मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते.