सारा अली खान क्रिकेटरशी लग्न करणार? शुभमन गिलसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीची स्पष्ट प्रतिक्रिया

सारा अली खानचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जातंय. शुभमन हा सध्या ‘नॅशनल क्रश’ बनला आहे. अभिनेत्री सारासोबतच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतही त्याचं नाव जोडलं जातंय.

सारा अली खान क्रिकेटरशी लग्न करणार? शुभमन गिलसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीची स्पष्ट प्रतिक्रिया
Sara Ali Khan and Shubman GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:57 PM

मुंबई : चित्रपट असो किंवा खासगी आयुष्य.. अभिनेत्री सारा अली खान नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच तिचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये पहिल्यांदाच तिने अभिनेता विकी कौशलसोबत काम केलं आहे. या दोघांमधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि विकी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यासाठी त्यांनी बऱ्याच मुलाखतीसुद्धा दिल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साराला तिच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.

आजी शर्मिला टागोर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत तू सुद्धा क्रिकेटरशी लग्न करशील का, असा प्रश्न साराला या मुलाखतीत विचारण्यात आला. साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जात आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. मात्र डेटिंगच्या चर्चांवर त्यांनी कधीच स्पष्ट उत्तर दिलं नाही. मात्र क्रिकेटरशी लग्न करणार का, या प्रश्नाचं उत्तर साराने फार प्रामाणिकपणे दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

“ती व्यक्ती अभिनेता, क्रिकेटर, व्यावसायिक किंवा डॉक्टर असल्याने मला फरक पडत नाही. कदाचित डॉक्टर नसावी, कारण ती व्यक्ती पळून जाईल. पण मस्करी बाजूला ठेवून बोलायचं झाल्यास, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर माझ्याशी जुळून घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही ते करू शकलात तर चांगली गोष्ट आहे. एखादा व्यक्ती कोण आहे किंवा काय करतो यापेक्षा माझ्यासाठी ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे”, असं सारा म्हणाली.

“तू सध्या भारतीय क्रिकेट टीममधील कोणाला डेट करतेय का”, असाही प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती पुढे म्हणाली, “मी याचं उत्तर प्रामाणिकपणे देईन. मी हे खात्रीने सांगू शकते की अशा व्यक्तीला मी अजून भेटले नाही, ज्याच्यासोबत मी माझं संपूर्ण आयुष्य व्यतित करू शकेन. मला खरंच वाटत नाही.”

सारा अली खान तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मुलाखतींमध्ये ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होताना दिसते. याआधी ‘कॉफी विथ करण’मध्ये साराने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर कार्तिक आणि सारा काही महिने रिलेशनशिपमध्येही होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता सारा अली खानचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जातंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.