Shubman Sara | एअरपोर्टवर शुभमन गिल-सारा अली खान पुन्हा एकत्र; सोशल मीडियावर फोटो लीक

सोशल मीडियावर एका युजरने हा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सारा आणि शुभमन एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो एअरपोर्टवरील असल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि शुभमन बाजूबाजूला बसलेले असून ते एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न असल्याचं पहायला मिळत आहे.

Shubman Sara | एअरपोर्टवर शुभमन गिल-सारा अली खान पुन्हा एकत्र; सोशल मीडियावर फोटो लीक
Shubman Gill and Sara Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 4:43 PM

अहमदाबाद: क्रिकेटर शुभमन गिलने टी 20 सामन्यात न्यूझीलँडविरोधात शतक ठोकत दमदार कामगिरी केली. या धडाकेबाज खेळीनंतर शुभमन त्याच्या खासगी आयुष्यामुळेही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शुभमनसोबत अभिनेत्री सारा अली खान पहायल मिळतेय. सारा आणि शुभमनचे फोटो आणि व्हिडीओ याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर एका युजरने हा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सारा आणि शुभमन एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो एअरपोर्टवरील असल्याचं म्हटलं जात आहे. सारा आणि शुभमन बाजूबाजूला बसलेले असून ते एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न असल्याचं पहायला मिळत आहे.

सारासोबतचा शुभमनचा हा फोटो नवीन आहे की जुना हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. याआधीही दोघांना एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हायरल फोटो-

‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला या शोमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं होतं.

साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट करतोयस का, असं शुभमनला विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने म्हटल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सारा आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. या दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा हे दोघं एकत्र दिसले होते. दिल्लीच्या एका हॉटेलमधून बाहेर पडताना या दोघांना पाहिलं गेलं होतं.

याआधी सारा अली खानचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये जेव्हा साराने ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिने कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचा खुलासा केला होता. ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2020 मध्ये कार्तिक आणि साराचं ब्रेकअप झालं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.