Sara Ali Khan हिच्या पोस्टवर नेटकरी म्हणाले, ‘शुभमनसोबत कोणतीही अडचण होणार नाही…’

सारा अली खान - शुभमन गिल यांच्या नावाची पुन्हा रंगली चर्चा; अभिनेत्रीने आता असं काय केलं, ज्यामुळे पुन्हा सुरू झाली सारा आणि शुभमन गिल यांच्या नावाची चर्चा.. साराची पोस्ट पाहून तुम्हीही म्हणाल...

Sara Ali Khan हिच्या पोस्टवर नेटकरी म्हणाले, 'शुभमनसोबत कोणतीही अडचण होणार नाही...'
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 10:57 AM

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम आणि वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत साराचं नाव अव्वल स्थानी आहे. सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत नसते, तर अभिनेत्रीचा स्वभाव देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. एवढंच नाही तर, सारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

सारा आणि शुभमन यांच्या नात्याची चर्चा सुरु असताना अभिनेत्रीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यानंतर पुन्हा सारा आणि शुभमन यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. व्हिडीओ साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. सध्या साराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये सारा एका रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे सारा स्वतः व्हिडीओ तयार करत आहे. सारा पंजाब याठिकाणी फिरताना दिसत आहे. सारा रिक्षा चालकाला विचारते आपण कुठे आहोत, यावर रिक्षा चालक म्हणतो पंजाबमध्ये… सध्या सर्वत्र साराच्या व्हिडीओची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे सारा एका ढाब्यावर थांबते. ढाब्यावर सारा पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेले पदार्थ खाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सारा प्रत्येक पदार्थबद्दल सांगताना दिसत आहे. साराला नवीन लोकांना भेटायला आणि नवीन पदर्थांची चव चाखलया प्रचंड आवडतं. ती कायम असे व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेक जण कमेंट करत आहेत. एवढंच नाही तर, अनेकांनी साराचं नाव शुभमनसोबत देखील जोडलं आहे. एक नेटकरी साराच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘चांगलं आहे… आताच सवय करुन घेत आहे.. म्हणजे पुढे शुभमनसोबत कोणतीही अडचण होणार नाही…’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘रिक्षा चालक रिक्षा फरारीपेक्षा अधिक वेगात चालवत आहे..’ अनेकांनी साराच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. तू सारा अली खानला डेट करतोयस का, असं शुभमनला विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने म्हटल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सारा आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. पण आद्याप सारा आणि शुभमन यांनी देखील त्यांच्या नात्याचं सत्य चाहत्यांना सांगितलेलं नाही. सारा आणि शुभमन त्यांच्या नात्याचा कधी स्वीकार करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.