Video | इब्राहिमच्या बाॅलिवूड पदार्पणाच्या अगोदर सारा अली खान थेट अजमेर शरीफ दर्ग्यात, अभिनेत्रीला पाहून लोकांची तोबा गर्दी
सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. सारा अली खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सारा अली खान हिचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सारा अली खान हिचे हे व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत असते. सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सारा अली खान कधी रिक्षाने मुंबईत प्रवास करताना दिसते तर कधी चक्क टॅक्टरचे स्टेरिंग हातामध्ये घेऊन शेतामध्ये मेहनत घेताना दिसते. काही दिवसांपूर्वी एका मेकअप मॅनसोबत पल पल ना माने टिंकू जिया या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली. सारा अली खान ही सोशल मीडियावरही (Social media) नेहमीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून 2018 मध्ये सारा अली खान हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सारा अली खान हिने मोठा खुलासा केलाय. सारा अली खान हिने स्पष्ट केले की, तिचा भाऊ अर्थात इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्याने त्याच्या आगामी पहिल्या चित्रपटाचे शूटिंग देखील नुकताच पूर्ण केले आहे. करण जोहर याच्या चित्रपटात इब्राहिम हा मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे की, इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. नुकताच सारा अली खान हिचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सारा अली खान हिचे हे व्हिडीओ अजमेरमधील आहेत. अजमेर शरीफ दर्ग्यात सारा पोहचली आहे.
अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये सारा अली खान ही प्रार्थना करताना दिसली. सारा अली खान हिचे अजमेर शरीफ दर्गातील अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत. सारा अली खान हिला पाहून चाहत्यांनी मोठी गर्दी ही केली होती. सलवार-सूट घालून एकदम साध्या लूकमध्ये सारा ही दर्ग्यात पोहचली होती. व्हिडीओमध्ये लोक सारा अली खान हिच्यासोबत फोटो देखील काढताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सारा अली खान आणि विकी काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान ही दिसत आहे. इब्राहिम अली खान याच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी प्रार्थना करण्यासाठीच सारा अली खान ही अजमेरला गेल्याचे देखील सांगितले जात आहे. सारा अली खान हिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.