सारा तेंडुलकर – शुबमन गिल यांनी दिली प्रेमाची कबुली! व्हायरल फोटो आश्चर्याचा धक्का देणारा
Sara Tendulkar - Shubman Gill | गेल्या काही दिवसांपासून शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता देखील एका खास फोटोमुळे सारा - शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत... सध्या सर्वत्र व्हायरल फोटोची चर्चा..
मुंबई | 8 मार्च 2024 : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांचे लेक सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर शुबमन गिल कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. पण क्रिकेटर हार्दिक पंड्या याने 2020 मध्ये सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे सारा – शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. आता देखील सारा – शुबमन यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामुळे दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर सारा – शुबमन यांचे काही फोटो व्हायरल होत आहे. दोघांच्या फोटोमध्ये सारखी दिसणारी एक गोष्ट म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा. दोघांच्या फोटोमध्ये देखील सारखा दिसणारा कुत्रा दिसत आहे. कुटुंबातील सर्वात खास सदस्य दोघांच्या फोटोमध्ये असल्यामुळे चाहत्यांमध्ये सारा – शुबमन यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लगाल्या आहे.
Connecting dots pic.twitter.com/T7jJRF1D5o
— Div🦁 (@div_yumm) March 6, 2024
सारा – शुबमन यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फोटोवर केमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘कनेक्टिंग डॉग…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘खास फोटो…’ काही नेटकऱ्यांनी फोटो ईमोजी कमेंट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा – शुबमन यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शुबमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत जोडलं जात होतं. एवढंच नाहीतर, दोघांचं ब्रेकअप झाल्यामुळे सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चा देखील दिल्या. पण आम्ही कधीही नात्यात नव्हतो असं साराने स्पष्ट केलं होतं. पण दोघांना देखील अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होतं.
सारा तेंडुलकर – शुबमन गिल
सारा तेंडुलकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सारा कायम स्वतःचे फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.. तर शुबमन गिल लोकप्रिय क्रिकेटर आहे. शुबमन कायम त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतो.