AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा; अंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला अन्..

वैशालीचा साखरपुडा झाला होता आणि साखरपुड्याच्या काही दिवसांनंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. आता तिच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात चलान दाखल केलं आहे.

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा; अंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला अन्..
Vaishali ThakkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 4:47 PM

मुंबई: ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. वैशाली ठक्करच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. वैशालीचा साखरपुडा झाला होता आणि साखरपुड्याच्या काही दिवसांनंतर तिने टोकाचं पाऊल उचललं. आता तिच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात चलान दाखल केलं आहे.

वैशालीचा प्रायव्हेट व्हिडीओ केला शूट

आरोपी राहुल नवलानी याने वैशालीचा अंघोळ करतानाच व्हिडीओ शूट केला होता, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. हा व्हिडीओ शूट केल्यानंतर त्याने वैशालीच्या होणाऱ्या पतीला तो पाठवला. यामुळे तिचं लग्न मोडलं. त्यानंतरच वैशालीने आत्महत्या केली. ऑगस्ट 2021 मध्ये गोव्यात हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता, अशी माहिती मिळतेय.

होणाऱ्या पतीला पाठवला वैशालीचा प्रायव्हेट व्हिडीओ

वैशाली राहुलसोबत गोव्याला फिरायला गेली होती. तिथे दोघं तीन दिवस एका हॉटेलमध्ये राहिले होतं. त्यावेळी राहुल आणि वैशाली एकमेकांना डेट करत होते असंही म्हटलं जात आहे. गोव्यात दोघांमध्ये लग्नाविषयीही चर्चा झाली होती. त्याचवेळी राहुलने वैशालीचा अंघोळ करताना व्हिडीओ शूट केला होता. याविषयी वैशालीला काहीच माहिती नव्हती. नंतर जेव्हा तिने मितेशशी साखरपुडा केला, तेव्हा राहुलने व्हिडीओवरून तिला ब्लॅकमेल केलं. यामुळेच ती सतत चिंतेत होती.

हे सुद्धा वाचा

आरोपीची जामिनावर सुटका

आरोपी राहुलने एका बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून वैशालीच्या होणाऱ्या पतीला तिचा प्रायव्हेट व्हिडीओ पाठवला होता. आता राहुलने या सर्व गोष्टी मान्य करण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी ही काल्पनिक कहाणी तयार केली असून त्यात मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा बचाव राहुलने केला.

वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस मितेशचीही चौकशी करणार आहेत. आरोपी राहुल नवलानीची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र वैशालीच्या कुटुंबीयांकडून पोलिसांकडे न्यायाची मागणी केली जात आहे. त्यांनी राहुलच्या जामिनालाही विरोध केला आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.