AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नंसीचं नाटक करतेय, पतीची गावभर चर्चा करते.. टोमण्यांना वैतागून दीपिकाने सुनावले खडेबोल

दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.

प्रेग्नंसीचं नाटक करतेय, पतीची गावभर चर्चा करते.. टोमण्यांना वैतागून दीपिकाने सुनावले खडेबोल
Dipika KakarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2023 | 11:51 AM
Share

मुंबई : ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिकाचा युट्यूब चॅनल असून त्यावर ती विविध व्हिडीओ अपलोड करते. आता नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिने ट्रोलर्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नंसीवर प्रश्न उपस्थित केले, त्यांनाही तिने सुनावलं. आपल्या प्रेग्नंसीबाबत काही जण नकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याची तक्रार तिने केली. ती फेक बेबी बम्प दाखवतेय, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती. अशा प्रतिक्रियांवर तिने संताप व्यक्त केला आहे.

दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केलं असून नुकतेच त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. तेव्हासुद्धा काही जणांनी तिच्या पतीबाबत वाईट कमेंट्स लिहिले होते. शोएबसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही दीपिकाने खडेबोल सुनावले.

“शोएब अभिनेता आहे आणि टीव्ही अभिनेता असणं खूप कठीण असतं. अर्ध्या तासाच्या मालिकेमागे खूप लोकांची मेहनत असते. त्यामुळे जे लोक नकारात्मक कमेंट करतात, ते सत्य जाणून न घेता फालतू बडबड करतात. इतकंच नाही तर माझा भूतकाळ मधे आणला जात आहे. माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला काय माहित आहे? मी कोणत्या त्रासातून गेले, याबद्दल तुम्हाला काय माहित”, असा सवाल तिने केला.

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

पतीबद्दल दीपिका पुढे म्हणाली, “मी अभिमानाने शोएबची स्तुती करत राहीन. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आता तुम्ही म्हणाल की मी अभिनय करतेय. तर होय, आम्ही सर्वकाही करतो.” या व्लॉगमध्ये दीपिकाने काही कमेंट्ससुद्धा वाचून दाखवल्या.

ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिका प्रकाशझोतात आली होती. सलमान खानच्या बिग बॉस 12 ची ती विजेतीदेखील ठरली आहे. दीपिकाने 2018 मध्ये टीव्ही अभिनेता शोएबसोबत लग्न केलं. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका शोएबच्या प्रेमात पडली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.