Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणी बंद लिफाफ्यात पुरावे पोलिसांच्या हातात

Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणी आणखी दोघांची नावे समोर, पोलिसांच्या हातात बंद लिफाफ्यात कोणी दिले पुरावे? सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ...

Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणी बंद लिफाफ्यात पुरावे पोलिसांच्या हातात
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 12:01 PM

मुंबई : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाला आता एक आठवडा पूर्ण होणार आहे. एकीकडे या मोठ्या धक्क्यातून त्यांचं कुटुंब अद्याप सावरलेलं नाही. तर दुसरीकडे सतीश कौशिक यांचं निधन नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा खळबजनक दावा सान्वी मालू सतत करताना दिसत आहेत. होळी निमित्त सतीश कौशिक यांनी विकास मालू यांच्या फार्म हाऊसमध्ये पार्टी केली. पार्टीनंतर सतीश कौशिक यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. अशात फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांची पत्नी सान्वी मालू यांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सान्वी मालू यांनी बंद लिफाफ्यात पुरावे देखील पोलिसांकडे सोपावले आहेत. ज्यामुळे सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी आणखी रहस्य वाढत आहे.

विकास यांची पत्नी सान्वी यांनी सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी स्वतःच्या पतीला दोषी ठरवलं असून पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे. अखेर पोलिसांनी मंगळवारी सान्वी यांची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सान्वी यांना २५ प्रश्न विचारली आहेत. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सान्वी यांनी लिखीत स्वरूपात दिली.

सान्वी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद लिफाफ्यामध्ये त्यांनी पोलिसांकडे पुरावे देखील सादर केले आहेत. पोलिसांनी गांभिर्याने आणि सत्यावर विश्वास ठेवून तपास केला तर आरोप सिद्ध होतील.. असं देखील सान्वी मालू म्हणाल्या आहेत. शिवाय सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी अनस आणि मुस्ताफा ही दोन नावे देखील समोर आली आहेत.

हे सुद्धा वाचा

सान्वी यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास आणि सतीश यांच्यामध्ये व्यवहारिक संबंध नव्हते, असं सांगण्यात येत आहे. पण विकास आणि सतीश यांच्यामध्ये व्यवहारिक संबंध होते याचे पुरावे सान्वी यांच्याकडे आहेत. सांगायचं झालं तर, सान्वी मालू यांनी केलेल्या आरोपांमुळे सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे.

दरम्यान, सतीश कौशिक आणि विकास मालू यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाले होते.. असं देखील सान्वी यांनी सांगितलं आहे. विकास मालू यांनी सतीश कौशिक यांच्याकडून तब्बल १५ कोटी रुपये घेतले होते. अशात सतीश सतत विकास यांच्याकडून १५ कोटी रुपयांची मागणी करत होते. पण विकास यांचं कोरोना काळत नुकसान झाल्यामुळे ते पैसे परत करण्यास असमर्थ होते… असं देखील सान्वी यांनी सांगितलं.

गेल्या वर्षा सतीश आणि विकास यांच्याच वाद झाले होते. त्यामुळे मी जेव्हा भारतात येईल तेव्हा पैसे परत करेल… असं विकास यांनी सतीश यांना आश्वासन दिलं होतं, असं सान्वी यांनी सांगितलं.. पैशांच्या कारणामुळे सतीश यांची हत्या करणार असल्याचं विकास यांनी मला सांगितलं होतं. सतीश यांची हत्या करण्यासाठी विकास एका रशियन मुलीचा वापर करून ब्लू पिल्स देवून हत्या करणार असल्याचा धक्कादायक खुलासा विकास मालू यांच्या पत्नी सान्वी मालू यांनी सतीश यांच्या निधनानंतर केला.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.