Satish Kaushik यांचं हृदयविकाराने निधन की आणखी काही? पोलिसांच्या एन्ट्रीने भुवया उंचावल्या

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक चर्चा रंगत आहेत. सतीश यांचं निधन हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झालं की, दुसऱ्या कोणत्या कारणामुळे अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला? पोलिसांच्या एन्ट्रीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

Satish Kaushik यांचं हृदयविकाराने निधन की आणखी काही? पोलिसांच्या एन्ट्रीने भुवया उंचावल्या
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 1:05 PM

Satish Kaushik : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कोशिक यांच्या निधनानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. जेव्हा सतीश कौशिक मित्राला भेटण्यासाठी फार्महाऊसमध्ये गेले होते, तेव्हा नक्की काय झालं? एवढंच नाही तर, सतीश यांनी रुग्णालयात घेवूण आलेल्या व्यक्तींची देखील पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र सतीश कौशिक यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक मित्रांसह होळीचा आनंद लुटण्यासाठी दिल्ली याठिकाणी पोहोचले होते. तेव्हा मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर सतीश कौशिक यांनी तात्काळ फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सतीश कौशिक यांना जवळपास रात्री २.३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सतिश कौशिक यांच्या निधनानंतर आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन दिल्ली येथील दीन दयाल रुग्णालयात मेडिकल बोर्ड यांच्याद्वारे करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सतीश कौशिक यांच्या निधनाची वेळ, त्यांनी कोणते पदार्थ खाल्ले होते किंवा काय प्यायले होते? यासर्व गोष्ट स्पष्ट होतील. शिवाय सतीश यांना रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या संपर्कात देखील पोलीस आहेत.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं कारण म्हणजे, सतीश यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना हृदयविकाराची शक्यता फार कमी वाटत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिल्ली पोलिसांना सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली आणि शवविच्छेदन करण्यास सांगितलं.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक एखाद्या ठिकाणावरुन पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शवविच्छेदन गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतर सतीश कौशिक यांचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं हे स्पष्ट होईल.

सतीश कौशिक यांना करियरमध्ये प्रचंड स्ट्रगल करावं लागला. १९८० साली सतीश कौशिक यांनी करियरला सुरुवात केली. पण त्यांना लोकप्रियता १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेतून मिळाली. कॅलेंडर या भूमिकेमुळे सतीश कौशिक प्रसिद्धीझोतात आले.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....