Seema Haider | अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, तर…? सीमा हैदरने राष्ट्रपतींकडे मागितली दाद

सीमा हैदर हिला मिळू शकतं भारताचं नागरिकत्व? अदनान सामी यांचा दाखला देत सीमा हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली मागणी

Seema Haider | अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, तर...? सीमा हैदरने राष्ट्रपतींकडे मागितली दाद
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 1:45 PM

मुंबई | 23 जुलै 2023 : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर हिला आता भारताचं नागरिकत्व हवं आहे. यासाठी सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दाद देखील मागितली आहे. सीमा हिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी राष्ट्रपती भवनाकडे याचिका दाखल केली. सीमाने भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामी यांचा हवाला दिला आहे.

‘मी सीमा हैदर नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीणा याच्यावर प्रेम करते आणि मला त्याच्यासोबत राहायचं आहे…’ असं याचिकेत म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे विनंती केली आहे की, जर तिला माफी मिळणार असेल तर, सीमा पती सचिन याच्यासोबत भारतात राहू शकते.

एवढंच नाही तर, यावेळी सीमा हिने गायक अदनान सामी यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर येत आहे. जर भारतात बराच काळ राहिल्यानंतर प्रसिद्ध गायक अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं तर, सीमाला देखील भारताचं नागरिकत्व मिळायला हवं.. भारतात राहण्याची परवानगी मिळाल्यानंतर मी सन्मानाने भारतात राहू शकते… असं देखील सीमा म्हणाली आहे.

हे सुद्धा वाचा

महत्वाची गोष्ट सीमा हिने दाखल केलेल्या याचिकेत सरकारी आकड्यांचा देखील दाखला देण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश येथील ४ हजार नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. सीमाच्या वतीने वकील एपी सिंह यांनी याचिकेत सांगितले की, सीमा तपासात सर्व यंत्रणांना सहकार्य करत आहे. ‘पाकिस्तानी गुप्तहेर’च्या आरोपावरून ती लाय डिटेक्टर चाचणी देण्यासही तयार आहे. असं देखील सांगण्यात येत आहे.

सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली की जर तिला भारतीय नागरिकत्व मिळाले तर ती पती, सासू आणि सासरे यांच्यासोबत राहू शकेल. एवढंच नाही तर, सीमा फारशी शिक्षित नाही असं देखील वकील एपी सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे. सध्या सीमा एटीएसच्या निशाण्यावर आहे. सर्वत्र सीमा हैदर प्रकरणाने खळबळ माजली आहे.

अदनान सामी यांना मिळालं भारताचं नागरिकत्व..

पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामी यांना २०१६ मध्ये भारताचं नागरिकत्व देण्यात आलं. नागरिकत्व प्रक्रियेतून जाण्यासाठी अदनान यांना ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्याची आठवण करवून देताना गायक म्हणाले, “पण मी कधीही आशा सोडली नाही, मी कधीही हार मानली नाही.” अदनान यांनी सांगितले होते की, यासाठी त्यांना १६ वर्षे वाट पाहावी लागली होती.

शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.