Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’मध्ये सहभागी होणार सीमा हैदर? अखेर सीमाने केला मोठा खुलासा, म्हणाली मी नक्कीच
बिग बॉस 17 ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. चाहत्यांमध्ये बिग बॉस 17 बद्दल मोठे क्रेझ आहे. सलमान खान हाच बिग बॉस 17 होस्ट करताना दिसेल. परत एकदा ती धमाल चाहत्यांना बघायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले पार पडला आहे.
मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) याचा बहुचर्चित शो बिग बॉस सीजन 17 सध्या जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे चाहते हे बिग बॉस सीजन 17 ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. बिग बाॅस 16 ने टीआरपीमध्ये मोठा धमाका केला. विशेष म्हणजे ते सीजन सुपरहिट ठरले. यामुळेच आता निर्मात्यांना बिग बॉस सीजन 17 (Bigg Boss 17) कडून अत्यंत मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. बिग बॉस सीजन 17 हिट करण्यासाठी निर्मात्यांनी देखील कंबर कसली आहे. यासाठी सध्या चर्चेत असलेल्या लोकांशी संपर्क साधला जात आहे.
विशेष म्हणजे एक चर्चा तूफान रंगताना दिसली, ती म्हणजे पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेली सीमा हैदर ही बिग बॉस सीजन 17 मध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये सीमा हैदर तिच्या आयुष्यातील अत्यंत खास असलेल्या व्यक्तीसोबत सहभागी होणार आहे. या शोमध्ये सीमा हैदर ही काही मोठे खुलासे करण्याची देखील दाट शक्यता आहे.
ज्याच्यासाठी पाकिस्तानमधून भारत गाठला, त्याच सचिन मीना याच्यासोबतच बिग बॉस सीजन 17 मध्ये सीमा हैदर सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता यावर सीमा हैदर हिने मोठा खुलासा केला आहे. सीमा हैदर हिने सांगितले की, फक्त बिग बॉस सीजन 17 च नाही तर तिला कपिल शर्मा याच्या शोमध्ये देखील बोलावले आहे.
पुढे सीमा हैदर ही म्हणाली की, मी बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होण्याचा अजून काही विचार केला नाहीये. मी यावर लवकरच विचारल करेल. जे काही आहे ते मी सर्वांसमोर सांगेल. म्हणजे आता हे नक्कीच आहे की, सीमा हैदर आणि सचिन मीना हे बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होऊ शकतात.
बिग बॉस सीजन 17 च्या निर्मात्यांनी सीमा हैदर हिच्यासोबत संपर्क साधलाय. रिपोर्टनुसार सीमा हैदर आणि सचिन मीना हे बिग बॉस सीजन 17 मध्ये सहभागी होऊ शकतात. जर सीमा हैदर ही बिग बॉस सीजन 17 मध्ये सहभागी झाली तर मोठे खुलासे होऊ शकतात आणि बिग बॉस सीजन 17 ला देखील याचा मोठा फायदा होऊ शकतो.
सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यावर एक चित्रपट लवकरच तयार केला जाणार आहे. बिग बॉस सीजन 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता ही बघायला मिळत आहे. चाहते या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले पार पडला आहे. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता ठरला आहे.