Seema Haider | पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आता होणार बॉलिवूडची हिरोइन; ‘या’ निर्मात्याने दिली मोठी ऑफर

हातातील काम गमावल्याने दोघांसमोर रोजच्या खाण्यापिण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. हे वृत्त जेव्हा व्हायरल झालं तेव्हा एका चित्रपट निर्मात्याने त्यांना एका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.

Seema Haider | पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आता होणार बॉलिवूडची हिरोइन; 'या' निर्मात्याने दिली मोठी ऑफर
Seema haider-Sachin MeenaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 10:13 AM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं नाव सध्या देशभरात चांगलंच चर्चेत आहे. सचिनच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सीमाविषयी बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. किंबहुना याप्रकरणाचा तपाससुद्धा सुरू झाला आहे. मात्र या सर्व गोष्टींमागील मोठं सत्य म्हणजे सीमा आणि सचिन यांच्या हाती सध्या कामच नाही. हातातील काम गमावल्याने दोघांसमोर रोजच्या खाण्यापिण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. हे वृत्त जेव्हा व्हायरल झालं तेव्हा एका चित्रपट निर्मात्याने त्यांना एका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.

उत्तर प्रदेश नव निर्माण सेनाचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिन यांच्यासमोर मदतीचा हात पुढे केला आहे. अमित यांनी ‘हाऊस जानी फायर फॉक्स’ या त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मित होणाऱ्या चित्रपटात अभिनयाची ऑफर सीमाला दिली आहे. चित्रपटात काम देऊन तिची आर्थिक मदत करता येईल या अनुषंगाने त्यांनी ऑफर दिल्याचं समजतंय. अमित जानी यांचं हे प्रॉडक्शन हाऊस मुंबईत आहे. तर ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव असेल. उदयपूरमध्ये झालेल्या टेलर कन्हैय्या लाल साहूच्या हत्येवर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अमित जानी यांनी सीमा आणि सचिन यांना ऑफर दिली आहे की जर त्यांनी चित्रपटात काम केलं तर त्याबदल्यात त्यांना पैसे मिळतील. यासोबतच अमित यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत हेसुद्धा स्पष्ट केलं आहे की ज्याप्रकारे ती भारतात दाखल झाली, त्याच्याशी ते सहमत नाहीत. मात्र दोघं सध्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे भारतीय असल्याच्या नात्याने त्यांची मदत करणं आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

अमित जानी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की त्यांनी दोन दिवसांपूर्वी सीमा हैदरपर्यंत चित्रपटाची ऑफर पोहोचवली आहे. या ऑफरबद्दल विचार करून उत्तर देणार असल्याचं सीमाने त्यांना सांगितलं होतं. मात्र अद्याप तिने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाकिस्तानातून प्रेमासाठी पळून आलेल्या सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन यांचे सध्या बुरे दिन सुरु झाले आहेत. सीमा आणि सचिन तसेच सचिनचे वडील यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पोलिस केसमुळे कोणीही कमविण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याने उपासमार होत असल्याची तक्रार केली आहे. नोएडातील सचिन नावाच्या तरुणाशी सोशल मीडियाद्वारे प्रेमात पडून सीमा हैदर तिच्या चार मुलांसह पाकिस्तानातील स्वत:चा नवरा आणि संसार सोडून आली तेव्हापासून यांची अनोखी लव्हस्टोरी चर्चेत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.