‘बिग बॉस 17’च्या निर्मात्यांच्या विरोधात संतापाची लाट, थेट गंभीर आरोप, या प्रकारानंतर…

बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच बघायला मिळते. बिग बॉस 17 ला अजूनही टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाहीये. नुकताच आता बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर टिका होताना दिसतंय.

'बिग बॉस 17'च्या निर्मात्यांच्या विरोधात संतापाची लाट, थेट गंभीर आरोप, या प्रकारानंतर...
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 1:24 PM

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस 17 च्या घरात मोठ्या घडामोडी या बघायला मिळत आहेत. यामुळे चाहते हैराण झाले असून बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर टिका करताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉस 17 च्या घरातून दोन अत्यंत फेमस असे चेहरे बाहेर पडले. पहिल्यांदा नील भट्ट आणि रिंकू धवन हे बाहेर पडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नील भट्ट याला तर बिग बॉस 17 चा विजेता म्हणून लोक बघत होते. तसेच रिंकू धवन देखील धमाकेदार गेम खेळताना दिसली. असे असताना देखील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी ईशा हिला खास अधिकार देत घरातील एका सदस्याला बेघर करण्याचा अधिकार दिला. यावेळी तिने थेट ऐश्वर्या शर्मा हिलाच बेघर केले. ज्यानंतर ईशा हिच्यावर जोरदार टिका ही करण्यात आली. आता ऐश्वर्या शर्मा हिच्या पाठोपाठ थेट नील भट्ट हा देखील बेघर झालाय. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का नक्कीच बसलाय.

नील भट्ट आणि रिंकू धवन यांच्यानंतर आता थेट तिसरे एविक्शन झाले. यामध्ये अनुराग डोभाल हा थेट घराबाहेर पडलाय. आता अनुराग डोभाल याच्या चाहत्यांनी बिग बॉस 17 च्या निर्मात्यांच्या विरोधात आपला मोर्चा हा वळवला आहे. सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर जोरदार टिका केली जातंय.

इतकेच नाही तर हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे देखील सांगितले जातंय. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांच्या विरोधात नाराजी ही वाढताना दिसत आहे. इतकेच नाही तर अनुराग डोभाल बाहेर पडल्यानंतर एल्विश यादव याने देखील पोस्टवर कमेंट करत आपली नाराजी ही जाहिर केलीये. सध्या बिग बॉस 17 चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. बिग बॉस 17 च्या घरात दाखल झाल्यापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद हे होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने काही दिवसांपूर्वीच पती विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. ज्यानंतर चाहते हैराण झाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.