RARKPK | ‘रॉकी और रानी’मधील शबाना आझमी-धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे करण जोहरने जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

RARKPK | 'रॉकी और रानी'मधील शबाना आझमी-धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया
Dharmendra and Shabana AzmiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 10:44 AM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने भारतात 46 तर जगभरात 80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 28 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या लिप-लॉकचा हा सीन आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शबाना यांनी त्या किसिंग सीनवर पती जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा केला आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना यांनी सांगितलं की ‘रॉकी और रानी..’मधील धर्मेंद्र यांच्यासोबतच्या किसिंग सीनचा जावेद यांना फारसा फरक पडला नाही. “त्यांना काहीच फरक पडला नाही. पण त्यांना माझा रावडी स्वभाव थोडा खटकला. संपूर्ण चित्रपटात मी मोठमोठ्याने बोलत होते, शिट्ट्या वाजवत होते, ओरडत होते. माझ्या बाजूला बसलेली महिला तीच आहे का असा प्रश्न त्यांना चित्रपट पाहताना पडला होता. मी उत्सुकतेने वेडी झाले होते”, असं त्या म्हणाल्या.

“माझ्या सीनची इतकी चर्चा होईल असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा पडद्यावर आमचा किसिंग सीन येतो तेव्हा लोक टाळ्या वाजवतायत, हसत आहेत. त्या सीनच्या शूटिंगदरम्यान आम्हाला कोणतीच समस्या नव्हती. हे खरंय की याआधी मी स्क्रीनवर असे सीन्स फारसे केले नव्हते. पण धर्मेंद्र यांच्यासारख्या हँडसम व्यक्तीला कोणाला किस न करावंसं वाटेल?”, असं त्या मस्करीत म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाद्वारे करण जोहरने जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पंजाबी कुटुंबातील रॉकी आणि बंगाली कुटुंबातील रानीची ही प्रेमकहाणी आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस- 11.1 कोटी रुपये

दुसरा दिवस- 16.05 कोटी रुपये

तिसरा दिवस- 19 कोटी रुपये

एकूण- 46 कोटी रुपये

रणवीर या चित्रपटात रॉकी रंधावाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने 25 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं कळतंय. तर आलिया यामध्ये रानी चॅटर्जीच्या भूमिकेत आहे. आलियाने 10 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी रॉकीच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांना दीड कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर जया बच्चन या रॉकीच्या आजीच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे. रानीच्या आजीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री शबाना आझमी यांनीसुद्धा एक कोटी रुपये फी घेतली आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.